पंजाबमध्ये 'रोड शो'दरम्यान स्फोट; तीन ठार

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

भटिंडा- पंजाबमधील मौर येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका रोड शोदरम्यान झालेल्या स्फोटात तीन जण ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या स्फोटात अन्य 15 जण जखमी झाले आहेत.

मौर मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले हरमिंदरसिंग जस्सी यांच्या प्रचारार्थ आज सकाळी 8.30 वाजता रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी एका मारुती कारमध्ये ठेवलेल्या बॉंबचा स्फोट झाला. त्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, यातील दोघे अल्पवयीन आहे. या स्फोटामागे कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती पोलिस उपायुक्त घनश्‍याम थोरी यांनी दिली आहे.

हरिमंदरसिंग हे डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमितसिंग राम रहीम यांचे नातेवाईक आहेत. दरम्यान, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पंजाब राज्यप्रमुख अमरिंदर सिंग, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबिरसिंग बादल आदींनी या घटनेविषयी चिंता व्यक्त केली. आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा विजय निश्‍चित असल्याने पक्षाच्या विरोधात अशा प्रकारचे षडयंत्र रचले गेल्याचा आरोप अमरिंदर सिंग यांनी केला आहे.

जस्सी सुदैवाने बचावले
हरमिंदरसिंग जस्सी हा कार्यक्रम आटोपून आपल्या वाहनातून तेथून निघाले होते. तितक्‍यात हा स्फोट झाला. या स्फोटात त्यांच्या गाडीचे नुकसान झाले असून, जस्सी यातून सुदैवाने बचावले, अशी प्रतिक्रिया त्यांच्या वाहनचालकाने दिली आहे.

देश

नवी दिल्ली : डोकलाम येथे भारत आणि चीन यांच्यादरम्यान निर्माण झालेल्या पेचावर लवकर तोडगा निघेल. चीन याबाबत सकारात्मक पाऊल उचलेल,...

01.15 PM

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सध्या तळगाळातील लोकांमध्ये भाजपची प्रतिमा निर्माण करून पक्षाची...

11.54 AM

नवी दिल्ली : 2008 मधील मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याला आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयाकडून...

11.45 AM