"बोफोर्सची सुनावणी लवकर घ्यावी'

वृत्तसंस्था
रविवार, 6 ऑगस्ट 2017

1986 मध्ये झालेल्या बोफोर्सकडून हॉवित्झर तोफांच्या खरेदी प्रकरणी 1,437 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा दावा काही माध्यमांनी केल्यानंतर जनहितासाठी या प्रकरणाची सुनावणी लवकर घ्यावी, असे अग्रवाल यांनी याचिकेत म्हटले आहे

नवी दिल्ली - बोफोर्स प्रकरणी सुमारे दीड हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

भाजप नेते अजय अग्रवाल यांनी ही याचिका दाखल केली आहे. युरोपस्थित हिंदुजा बंधूंना बोफोर्स प्रकरणातून मुक्त करण्याच्या उच्च न्यायालयाच्या 2005 मधील निकाला अग्रवाल यांनी आव्हान दिले आहे. या प्रकरणी सीबीआयने न्यायालयाने दिलेल्या मुदतीत निकालाला आव्हान न दिल्याबद्दल अग्रवाल यांनी संशय व्यक्त केला होता.

1986 मध्ये झालेल्या बोफोर्सकडून हॉवित्झर तोफांच्या खरेदी प्रकरणी 1,437 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा दावा काही माध्यमांनी केल्यानंतर जनहितासाठी या प्रकरणाची सुनावणी लवकर घ्यावी, असे अग्रवाल यांनी याचिकेत म्हटले आहे.