झारखंडमधील चिमुकली "आयुषमान'ची पहिली लाभार्थी

Born minutes after launch, baby girl in Jharkhand becomes first beneficiary of Ayushman Bharat scheme
Born minutes after launch, baby girl in Jharkhand becomes first beneficiary of Ayushman Bharat scheme

जमशेदपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे (आयुष्मान भारत) उद्‌घाटन रविवारी (ता. 23) झारखंडमध्ये झाले. उद्‌घाटनानंत काही मिमिटांनी जन्मलेली बालिका या योजनेची पहिली लाभार्थी ठरली.

पूर्व सिंगभूम जिल्ह्यातील सरदार रुग्णालयात महातो (वय 24) ही गर्भवती काल सकाळी दाखल झाली होती. तिने दुपारी एकच्या दरम्यान शस्त्रक्रियेद्वारे (सिझेरियन) मुलीला जन्म दिला. तिचा सर्व वैद्यकीय खर्च हा या योजनेतून करण्यात येईल, असे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश्‍वर प्रसाद यांनी सांगितले. बाळंतिणीला रुग्णालयाकडून औषधे, जेवण आदी सेवा मोफत देण्यात आल्या आहेत. तिच्या शस्त्रक्रियेसाठी 18 हजार 500 रुपये खर्च आला, असे डॉक्‍टरांनी सांगितले.

"आयुषमान भारत' ही जगातील सर्वांत मोठी सरकारी योजना असल्याचे सांगण्यात आले. देशातील 10.74 कोटी गरीब कुटुंबांना या योजनेअंतर्गत दर वर्षी पाच लाखांचे आरोग्य कवच देण्यात येणार आहे. योजनेसाठी केंद्र सरकार 60 टक्के निधी देणार असून, 40 टक्के वाटा राज्यांकडे असेल. दीनदयाळ उपाध्याय जयंती दिनी उद्यापासून (ता. 25) या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

योजनेची वैशिष्टे 
- 10.74 कोटी गरीब कुटुंबांचा समावेश 
- ग्रामीण भागातील 8 कोटी कुटुंबांना फायदा 
- दर वर्षी पाच कोटींचे आरोग्य संरक्षण 
- 29 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 445 जिल्ह्यांत लागू 
- रुग्णालयात 14 हजार "आरोग्य मित्रांची' नियुक्ती 
- केंद्र व राज्य सरकारचा निधीत 60 ः 40 वाटा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com