...अन् पोलिसांच्या उपस्थितीत दुसऱ्या दिवशी पार पडला अपूर्ण विवाह

bride refuses to marriage in uttar pradesh
bride refuses to marriage in uttar pradeshbride refuses to marriage in uttar pradesh

लग्नात वराने मंगळसूत्र न आणल्याने वधूने (bride) सात फेरे घेण्यास नकार दिला. त्यानंतर वराती परतले. माहिती मिळताच स्थानिक पोलिस ठाण्याने तात्काळ वर आणि वधूच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलावून समजावले. दुसऱ्या दिवशी सकाळी वराच्या कुटुंबीयांकडून मंगळसूत्र आणण्यात आले. यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत अपूर्ण विवाह पार पडला. ठाणेदाराने मुलीची रवानगी केली आणि तिचे रक्षण करण्याचे आश्वासनही दिले. हा प्रकार उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील गौरीबाजार पोलिस स्टेशन हद्दीत घडला. (bride refuses to marriage in uttar pradesh)

लग्नासाठी वरात गोरखपूरच्या चौरी-चौरा येथून हरेराम यादव यांच्या घरापर्यंत आली होती. काही वरातींनी जेवणही केले होते. सात फेरे घेणार तेव्हा वराकडून लग्नासाठी दागिने आणले नसल्याचे समोर आले. यात मंगळसूत्रही नव्हते. वधू (bride) आदिती यादवला जेव्हा हे कळले तेव्हा ती मंडपातून उठली आणि निघून गेली. तिने लग्नाला (marriage) स्पष्ट नकार दिला. त्यानंतर मिरवणूक परत आली.

bride refuses to marriage in uttar pradesh
आईची काळजी घेण्यासाठी मोठे घर नाही तर मोठे हृदय लागतं - सुप्रीम कोर्ट

याची माहिती गौरीबाजारचे ठाणेदार विपिन मलिक यांना मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठून मुलीच्या भावाला व वर संजय यादवला पोलिस ठाण्यात आणले. त्यांना समजावले. त्यानंतर सकाळी वर आणि वडिलांनी मंगळसूत्रासह काही दागिने आणले. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत विधिपूर्वक विवाह पार पडला.

आमच्या बाजूने मुलांना हुंडा देण्यात आला तर त्या लोकांनी दागिने आणले नाहीत. त्यामुळे लग्न मोडत होते. यानंतर एसओ साहेबांनी मध्यस्थी केली. काही अडचण आली तर मी साथ देईन असे वचन दिले. त्यानंतर मोबाईलही भेट देण्यात आला. मला त्यांचे खूप खूप आभार मानायचे आहेत. मी सर्व लोकांचे पोलिसांचे आभार मानू इच्छितो. सर्वांच्या पाठिंब्याने मी लग्न केले, असे वधू अदिती म्हणाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com