जवान तेज बहाद्दुर यादव 'बीएसएफ'मधून बडतर्फ

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

नवी दिल्ली- लष्करामध्ये मिळत असलेल्या पदार्थांचा व्हिडिओ तयार करून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल केल्याप्रकरणी सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान तेज बहादूर यादव यांना 'बीएसएफ'ने बडतर्फ केले आहे, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी आज (बुधवार) दिली.

तेज बहादूर यादव यांनी व्हिडिओमधून लष्करातील जेवण व वरिष्ठ अधिकाऱयांवर आरोप केले होते. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर देशभर खळबळ उडाली होती. या घटनेची दखल पंतप्रधानांनी घेतली होती. शिवाय, यादव यांच्यानंतर विविध जवानांनी व्हिडिओ अपलोड केले होते. यामुळे लष्कराने जवानांना सोशल नेटवर्किंगचा वापर करण्यावर निर्बंध लादले आहेत.

तेज बहादूर यादव यांनी 9 जानेवारी रोजी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लष्कराने त्यांची चौकशी सुरू केली होती. लष्कराची माहिती उघड केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले असून, लष्करातून बडतर्फ करण्यात आले आहे.