बीएसएफचे अधिकारी अर्ध्या किंमतीत विकतात वस्तू

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

श्रीनगर- सीमा सुरक्षा दलाचे वरिष्ठ (बीएसएफ) अधिकारी स्थानिक विक्रेत्यांना अर्ध्या किंमतीमध्ये वस्तू विकत असून, यामध्ये पेट्रोल, डिझेल व अन्न पदार्थांचा समावेश असतो, अशी माहिती स्थानिकांनी दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

जम्मू-काश्मीरमधील सीमेवर तैनात असलेला बीएसएफ जवान तेज बहादूर यादव याने एक व्हिडिओ पोस्ट करुन देशभर खळबळ उडवून दिली. या जवानाने थेट लष्करी अधिकाऱ्यांवरच गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर या जवानाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगण्यात आले होते. तर, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

'श्रीनगर विमानतळाजवळ बीएसएफचे मुख्यालय आहे. बीएसएफचे अधिकारी इंधन व अन्य अन्न-पदार्थांच्या वस्तू अर्ध्या किंमतीत बाहेर दुकानदारांना विकत आहेत. रोजच्या वापराच्या वस्तूही आम्हाला नाकारल्या जातात आणि त्याच वस्तू बाहेर दलालांना विकल्या जातात,' अशी माहिती एका जवानाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. एका स्थानिक नागरिकाने सांगितले की, 'बीएसएफचे अधिकारी अर्ध्या किंमतीमध्ये पेट्रोल, डिझेल व अन्य पदार्थांची विक्री करतात. यामुळे जवानाने केलेल्या आरोपांची पडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य आढळून आले आहे.'

दरम्यान, फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करून लष्करी जवानांना मिळत असलेल्या अन्नाचा पंचनामा करणाऱ्या बीएसएफ जवानाची मानसिकस्थिती ठीक नसल्याचे सांगणाऱ्यांना जवानाच्या पत्नीने प्रत्युत्तर देत मग त्यांनी रक्षणासाठी सीमेवर का पाठविले असा प्रश्न उपस्थित केला आहे. जवानाने अपलोड केलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. सर्वसामान्य नागरिक जवानाच्या बाजूने उभे राहिले आहेत. याप्रकरणी चौकशीचे सुरू आहे.