भाजप, संघाला धडा शिकवा - मायावती

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जानेवारी 2017

केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे जनता नाराज आहे. नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरली आहे.

लखनौ - आरक्षण हा दलितांना घटनेने दिलेला हक्क आहे. तो हटविण्याचा कोणतेही सरकार, भाजप किंवा संघ करू शकत नाही. यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न भाजप किंवा काँग्रेसने केल्यास ते राजकारणातून नष्ट होतील. माझे जनतेला आवाहन आहे, की त्यांनी आगामी निवडणुकीत भाजप व संघाला धडा शिकवावा, अशी टीका बहुजन समाज पक्षाच्या (बसप) नेत्या मायावती यांनी केली.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मायावती यांनी सत्ताधारी समाजवादी पक्षासह भाजप, काँग्रेस पक्षांवरही जोरदार टीका केली. जातीय आरक्षणाचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, असे मत संघाचे प्रवक्ते मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले होते. याच मुद्द्यावरून मायवती यांनी संघ आणि भाजपला फटकारले.

मायवती म्हणाल्या, की केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे जनता नाराज आहे. नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरली आहे. आगामी निवडणुकीत नागरिकांनी बसपला मतदान करावे. मुस्लिमांनी समाजवादी पक्षाला मतदान करू नये. भाजपचा पराभव करण्यासाठी बसपलाच मतदान करा. भाजपला बिहारमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. आता उत्तर प्रदेशमध्येही तेच होणार आहे. 

देश

नवी दिल्ली : दुकानाच्या दारात दारू प्यायला बसलेल्यांना हटकल्याने दारूड्यांनी केलेल्या चाकुहल्ल्यात नवी दिल्लीत एकाचा मृत्यू झाला...

02.27 PM

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) प्रवेशाचा ठराव संयुक्त जनता दल (जेडीयू) पक्षाने आज (शनिवार) संमत केला. पक्षाच्या...

02.09 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर प्रकरणावरून आज (शनिवार) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर...

01.42 PM