उत्तर प्रदेशमध्ये बसप नेत्याची हत्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 मे 2017

बहुजन समाज पक्षाच्या नेते कैलास ठेकेदार (वय 40) यांची आज (गुरुवार) अमरोहा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

अमरोहा (उत्तर प्रदेश) : बहुजन समाज पक्षाच्या नेते कैलास ठेकेदार (वय 40) यांची आज (गुरुवार) अमरोहा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

'कैलास ठेकेदार हे एकटेच राहत होते. त्यांच्याकडे काम करणाऱ्या नोकराला ते आज त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळले. त्यांच्या शरीरात गोळी घुसल्याचे नोकराच्या निदर्शनास आले. आम्ही न्यायवैद्यक पथकाला बोलाविले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे', अशी माहिती अमरोहाचे सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र प्रताप सिंह यांनी दिली. झोपेत असतानाच ठेकेदार यांची गोळ्या घालून हत्या झाल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

बहुजन समाज पक्षात येण्यापूर्वी ठेकेदार यांनी समाजवादी पक्षाकडून स्थानिक निवडणुक लढविली होती.