अर्थसंकल्प आपल्यासाठी का महत्त्वाचा

गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

देशाच्या विकासाचा दर कसा मोजला जातो? 
मुख्यतः जीडीपीच्या माध्यमातून देशाच्या विकासाचा दर मोजला जातो. तीन वर्षांचा (2012-13, 2013-14, 2014-15 आणि 2015-16) भारताचा विकासदर हा क्रमाने 5.6 टक्के 6.6 टक्के आणि 7.6 टक्के होता. 

अर्थसंकल्पातल्या महत्त्वाच्या बाबी समजून घेतल्याशिवाय त्याचा परिणाम कळणार नाही. अर्थमंत्र्यांच्या भाषणाबरोबरच अन्य काही दस्तऐवजदेखील अर्थसंकल्पाचाच एक भाग असतात. या बाबी पुढीलप्रमाणे- 

1) अर्थसंकल्प दस्तऐवजामध्ये काय समाविष्ट असते. 
भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 112 नुसार सरकार संसदेत वार्षिक वित्तीय स्टेटमेंट सादर (Annual inancial Statement) करते, ज्यास आपण केंद्रीय अर्थसंकल्प असे म्हणतो. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांच्या भाषणाशिवाय खालील 14 दस्तऐवज असतात. 
1. Annual Financial Statement. 
2. Demands for Grants 
3. Receipts Budget 
4. Expenditure Budget Volume 1 
5. Expenditure Budget Volume 2 
6. Finance Bill 
7. Approriation Bill 
8. Memorandum explaining the provisions in the Finance Bill 
9. Budget at a Glance 
10. Highlights of the Budget 
11. Macro-economic policy framework for the relevant financial year 
12. Fiscal Policy Strategy Statement for the Financial year. 
13. Medium tem Fiscal Policy Statement 
14. Medium term Expenditure Framework Statement 

2. देशाच्या विकासाचा दर कसा मोजला जातो? 
मुख्यतः जीडीपीच्या माध्यमातून देशाच्या विकासाचा दर मोजला जातो. तीन वर्षांचा (2012-13, 2013-14, 2014-15 आणि 2015-16) भारताचा विकासदर हा क्रमाने 5.6 टक्के 6.6 टक्के आणि 7.6 टक्के होता. 

3. जीडीपी म्हणजे काय? 
जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्‍ट म्हणजेच देशात एका वर्षात निर्माण झालेल्या वस्तूंची व सेवांची एकूण किंमत. 

4. अर्थसंकल्पीय चक्र किती काळ चालते? 
पुढील वर्षाच्या एप्रिल ते मार्च या अकरा महिन्यांसाठी अर्थसंकल्पीय चक्र (Budget cycle) चालू राहते. 

5. सरकारी उत्पन्नाची साधने कोणती? 
अप्रत्यक्ष कर, प्रत्यक्ष कर व सार्वजनिक उद्योगातील निर्गुंतवणूक हे सरकारच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहेत. 

6. सरकारी खर्च कशाकशावर केला जातो? 
आजपर्यंत सरकारी खर्च दोन भागांमध्ये मांडला गेला. अ. नियोजित (planned) आणि ब. अनियोजित (unplanned). 12 व्या पंचवार्षिक योजनेतील हे शेवटचे वर्ष होते. या वर्षापासून सरकारी खर्च अ. Revenue Expenditure आणि ब. Capital Expenditure या दोन प्रकारांमध्ये मांडला जात आहे. या नवीन वर्गीकरणामुळे आर्थिक वाटपातील तफावत मोठ्या प्रमाणावर कमी होईल. 

7. वित्तीय बिल आणि अर्थसंकलप यातील फरक काय? 
वित्तीय बिल हे पुढील वर्षाच्या आर्थिक प्रस्तावास प्रभाव देण्यासाठी बजेट सादरीकरणानंतर मांडले जाते. यामध्ये अप्रत्यक्ष कर आणि प्रत्यक्ष करांबाबतच्या सुधारणा समाविष्ट असतात. वित्तीय बिल हा अर्थसंकल्पाच्या 14 भागांपैकी एक भाग आहे. 

8. वित्तीय तूट म्हणजे काय? 
ज्या बजेटमधील सरकारी खर्च हा सरकारच्या महसुलापेक्षा जास्त असतो, त्या परिस्थितीला वित्तीय तूट (Fiscal Deficit) असे म्हणतात. पुढील आर्थिक वर्षात सध्याच्या सरकारचे ध्येय निर्गुंतवणूक कार्यक्रमाद्वारे रु. 56 हजार कोटी उभे करणे उद्दिष्ट आहे. वित्तीय तूट ही आरबीआय व इतर बॅंकांमधून कर्ज घेऊन भरून काढली जाते. 

9. चालू खात्यावरील तूट म्हणजे काय? 
ज्या वेळेस देशाच्या वस्तू आणि सेवा आयातीचे मूल्य वस्तू आणि सेवा निर्यात मूल्यापेक्षा जास्त असते त्या परिस्थितीस चालू खात्यावरील तूट असे म्हणतात. चालू खात्यावरील तूट परकीय गुंतवणूक व निर्यातीने भरून काढता येते. 

10. वित्तीय तूट आणि चालू खात्यावरील तूट या देशासाठी योग्य आहेत का? 
2015-16 आणि 2016-17 या वर्षांसाठी वित्तीय तुटीचा दर 3.9 टक्के व 3.5 टक्के होती. एका विकसनशील देशासाठी हा दर नियंत्रण कक्षेमध्ये होता. या दराचा अर्थच असा की सरकार आलेला महसूल देशाच्या घडणीसाठी पुन्हा गुंतवणूक करण्यास बांधील आहे. 

(सकाळ साप्ताहिकमध्ये प्रसिद्ध झालेल्या पराग कुलकर्णी यांच्या लेखामधून साभार) 
 

Web Title: Budget 2018 Arun Jaitly presents union budget