कानपूरमध्ये इमारत कोसळून तीन ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

कानपूर - बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून झालेल्या अपघातात तीन जण ठार तर 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

शहरातील एका लोकप्रिय मशिदीच्या शेजारी सहा मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून या इमारतीच्या बांधकामाचे काम सुरू आहे. समाजवादी पक्षाचे नेते आणि पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष मेहताब आलम यांच्या गृहनिर्माण प्रकल्पातील ही इमारत होती. इमारत कोसळल्यानंतर जोरात आवाज झाला. त्यामुळे परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. त्यानंतर प्रचंड धूळ उडाल्याने काही वेळ समोरचे काहीही दिसत नव्हते. घटनास्थळी लष्कराचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिस दाखल झाले आहेत.

इमारतीच्या बांधकामाचे काम करणारे साधारण 40 कर्मचारी इमारतीमध्ये राहात होते. तीन जणांचे मृतदेह सापडले आहे. आणखी काही कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. कच्च्या बांधकामामुळे इमारत कोसळल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

देश

गुवाहाटी - आसाम राज्यामध्ये झालेल्या मुसळधार वृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे गेल्या...

01.18 PM

नवी दिल्ली : सत्तारूढ भाजपने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होताच 2019 मधील पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी पहिला...

09.51 AM

कोडाईकॅनल (तमिळनाडू) : मणिपूरमधून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) मागे...

09.42 AM