केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘दिवाळी भेट’; महागाई भत्यात 2 टक्के वाढ

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 125 टक्क्यांवरून वाढून 127 टक्क्यांवर पोचला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यास आज मंजुरी देण्यात आली

नवी दिल्ली: केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 'दिवाळी भेट' दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरूवारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात (डीए) 2 टक्के वाढीचा निर्णय घेतला आहे. वाढलेला महागाई भत्ता 1 जुलै 2016 पासून लागू होणार आहे. याचा केंद्र सरकारचे 50 लाख कर्मचारी आणि 58 लाख निवृत्तीधारकांना थेट लाभ मिळणार आहे.

आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 125 टक्क्यांवरून वाढून 127 टक्क्यांवर पोचला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यास आज मंजुरी देण्यात आली. कर्मचारी संघटनांनी 3 टक्के वाढ करण्याची मागणी केली होती. वस्तूंच्या किंमतीत होणाऱ्या वाढीचा उत्पन्नावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना महागाई भत्ता दिला जातो. याआधीची वाढ सप्टेंबर 2015 मध्ये करण्यात आली होती.

देश

पणजी (गोवा) : विधानसभा पोट निवडणूक शांततेत होईल असे वाटत असतानाच पणजी मयदारसंघातील टोंक-करंजाळे येथील मतदान केंद्र क्रमांक...

04.09 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात आठवडाभरात झालेल्या दोन रेल्वे दुर्घटनांची जबाबादारी स्वीकारत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे...

03.36 PM

बेळगाव : विद्यार्थ्यांनी देशभक्तीची गाणी वर्षातून दोन तीन वेळा फक्त स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या दिवशीच केवळ न म्हणता...

01.48 PM