कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा लुधियानात मेणाचा पुतळा

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मार्च 2017

राजीव गांधी यांनी अमरिंदरसिंग यांना काँग्रेसमध्ये आणले आणि राजकारणात सक्रिय केले. प्रथम 1980 मध्ये ते लोकसभेत निवडून गेले. 

लुधियाना : कॅप्टन अमरिंदरसिंग हे दुसऱ्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून आज (गुरुवार) शपथबद्ध होत असताना लुधियाना येथे त्यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. 

पंजाबमध्ये दहा वर्षांनंतर काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळवून देत सत्ता प्राप्त करण्यात कॅप्टन अमरिंदरसिंग यांची महत्त्वाची भूमिका होती. राजीव गांधी यांनी अमरिंदरसिंग यांना काँग्रेसमध्ये आणले आणि राजकारणात सक्रिय केले. प्रथम 1980 मध्ये ते लोकसभेत निवडून गेले. 

सर्वांत जुना पक्ष असलेला काँग्रेस 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बॅकफूटवर गेला होता. अमरिंदरसिंग यांनी या विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळविण्याचा हिय्या केला होता. ते पक्षाचे स्टार प्रचारक होते. त्यांनी पटियाला शहर मतदारंसघातून विधानसभा निवडणूक लढवली. येथून त्यांनी सलग तीनवेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. 
त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने भाजप, शिरोमणी अकाली दल, आप यांना पाणी पाजले. पंजाबमध्ये 117 पैकी 77 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. 
 

Web Title: Captain Amarinder Singh's wax statue unveiled in Ludhiana