भूपिंदर हुडा यांच्यासह "एजेएल'विरुद्ध गुन्हा

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 एप्रिल 2017

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण; कॉंग्रेस नेत्यांच्या चौकशीची शक्‍यता

नवी दिल्ली: नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राला भूखंड वाटप करताना गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाप्रकरणी हरियानाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपिंदर हुडा आणि वृत्तपत्र चालविणाऱ्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हेगारी कट रचणे आणि फसवणुकीसंदर्भात गुरुवारी गुन्हा दाखल केला.

गांधी कुटुंबासह कॉंग्रेसचे वरिष्ठ नेत्यांचे यंग इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडवर नियंत्रण असल्याचे सांगितले जाते. जवाहरलाल नेहरू यांनी नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र चालविण्यासाठी "एजेएल'ची स्थापना केली होती. या प्रकरणात कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची चौकशी होण्याची शक्‍यता आहे.

हरियाना राज्य दक्षता विभागाने गुन्हेगारी कट, फसवणूक आणि भ्रष्टाचारांच्या आरोपाखाली दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालाची (एफआयआर) दखल घेत सीबीआयने हरियाना नागरी विकास प्राधिकरणाचे तत्कालीन अध्यक्ष (तत्कालीन मुख्यमंत्री भूपिंदर हुडा), प्राधिकरणाचे तत्कालीन मुख्य प्रशासक, तत्कालीन प्रशासक, वित्त आयुक्त, शहर आणि देश नियोजन विभाग, असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड आणि अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

Web Title: case against Bhupinder Singh Hooda