कावेरीच्या पाण्यावरून बंगळूर पेटले; एकाचा मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 सप्टेंबर 2016

बंगळूर - कावेरी पाणीवाटपावरून कर्नाटकमध्ये संघर्ष चिघळला असून, सोमवारी पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत. बंगळूरमधील 16 पोलिस ठाण्यांतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच केपीएन डेपोतील 20 बस पेटवून देण्यात आल्या आहेत.

कावेरीतून तमिळनाडूला 15 ऐवजी 12 हजार क्‍युसेक पाणी देण्याचा सुधारित आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर कर्नाटक आणि तमिळनाडूमध्येही संघर्षास सुरवात झाली आहे. तमिळनाडूत कन्नड नागरिकांच्या गाड्यांची मोडतोड करण्यात आली. हॉटेलची नासधूस करण्यात आली. बंगळूरमध्येही याला "जशास तसे‘ उत्तर देण्यात आले, तेथे तमीळ नागरिकांच्या हॉटेलवर हल्ले झाले. मैलापूर येथे काही तमीळ समर्थकांनी मूळ कर्नाटकचा रहिवासी असलेल्या व्यक्तीच्या हॉटेलवर हल्ला करून तोडफोड केली.

तमिळनाडूचे पासिंग असलेल्या गाड्यांची मोडतोड करण्यात आली आहे. बंगळूरमध्ये सोमवारी रात्री 50 जणांच्या गटाने तोडफोड करत जाळपोळ केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. बंगळूरमधील संवेदनशील 16 पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पाणीवाटपावरून दोन्ही राज्यांत संघर्ष निर्माण झाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. सिद्धरामय्या यांनी आज (मंगळवार) सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे.