रजनीकांत, प्रभूदेवा यांच्या सुरक्षेत वाढ

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 सप्टेंबर 2016

चेन्नई - कावेरी पाणी वाटपावरून कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमध्ये संघर्ष पेटला असून, चेन्नईत वास्तव्यास असलेल्या रजनीकांत, प्रभूदेवा आणि रमेश अरविंद यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

तमिळनाडूच्या पोलिस महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळचे कर्नाटकचे असलेले हे अभिनेते सध्या चेन्नईत वास्तव्यास आहेत. तमिळ नागरिकांकडून कन्नड नागरिकांवर झालेले हल्ले पाहता, यांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कावेरीतून तमिळनाडूला 15 ऐवजी 12 हजार क्‍युसेक पाणी देण्याचा सुधारित आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर कर्नाटक आणि तमिळनाडूमध्येही संघर्षास सुरवात झाली आहे.

दक्षिणेतील सुपरस्टार अशी ओळख असलेल्या रजनीकांत यांचे कर्नाटकमध्ये खूप चाहते आहेत. मात्र, कन्नड समर्थकांनी बंगळूरमध्ये त्यांच्या चित्रपटाचे पोस्टर्स फाडल्याचे वृत्त आहे. तमिळनाडूच्या निषेधार्थही यावेळी घोषणा देण्यात आल्या. म्हैसूरमध्येही रजनीकांतचे पोस्टर्स काढण्यात आली आहेत.