भाजप आमदारानेच केला बलात्कारः सीबीआय

CBI confirms rape charge against Unnao MLA Kuldeep Singh Sengar
CBI confirms rape charge against Unnao MLA Kuldeep Singh Sengar

नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाचा आमदार कुलदिपसिंह सेंगर याने माखी (उत्तर प्रदेश) गावामध्ये 4 जून 2017 रोजी युवतीवर बलात्कार केला आहे, असे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) म्हटले आहे.

राजकीय दृष्टया संवेदनशील असलेल्या उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पीडित तरुणीने भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगरवर बलात्काराचा आरोप केला होता. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी सेंगरला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र, यानंतर सरकारला टीकेला सामोरे जावे लागले आहे.

उत्तर प्रदेशातील बांगरमऊ येथून आमदार असलेल्या कुलदिपसिंह सेंगर याने चार जून 2017 रोजी घरात घुसून आपल्यावर बलात्कार केला. त्यावेळी त्याची महिला साथीदार शशी सिंह दरवाजाबाहेर उभी होती, असा आरोप पीडित तरुणीने केला होता. या आरोपाला सीबीआयने आता दुजोरा दिला.

दरम्यान, या प्रकरणात उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर चहूबाजूंनी जोरदार टीका झाली. सरकार आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न करत असल्याचे आरोप झाल्यानंतर निष्पक्ष तपासासाठी राज्य सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले.

या प्रकरणी 20 जूनला एफआयआर आणि त्यानंतर दाखल झालेल्या आरोपपत्रात स्थानिक पोलिसांनी कुलदिपसिंह सेंगर आणि अन्य आरोपींच्या नावाचा समावेश केला नाही. स्थानिक पोलिसांनी पीडित तरुणीच्या वैद्यकीय तपासणीला विलंब केला. शिवाय, न्यायवैद्यक प्रयोगशाळे तिचे कपडे पाठवले नव्हते. आरोपींशी हातमिळवणी करुन जाणीवपूर्व सर्व गोष्टींना विलंब लावण्यात आला असे सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले. सेंगर, शशी सिंह आणि अन्य आरोपींना सीबीआयने 13 आणि 14 एप्रिलला अटक केली असून, त्यांची चौकशी सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com