तारा सहदेवप्रकरणी 'CBI'चे आरोपपत्र दाखल

पीटीआय
मंगळवार, 23 मे 2017

नवी दिल्ली : राष्ट्रीय पातळीवरील नेमबाज तारा सहदेव यांनी धर्मांतरासाठी पती व सासूंकडून दबाव होत असल्याची तक्रार आल्यानंतर याप्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषणकडे (सीबीआय) सोपविण्यात आला. याप्रकरणी सीबीआयने आरोपी पती व सासूविरोधात आरोपपत्र दाखल केले.

सहदेव यांचे पती रणजितसिंह कोहली ऊर्फ रकीबूल हसन आणि सासू कौशल राणी यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाच्या कटाचाही आरोप करण्यात आला आहे. सहदेव यांचे 7 जुलै 2014 रोजी लग्न झाले. या वेळी त्यांचे पती आणि सासू यांनी त्यांचा धर्म लपविला. लग्नानंतर त्यांनी सहदेव यांना धर्मांतरासाठी दबाव आणला.

तसेच हुंड्यासाठी छळही केला असा आरोप सहदेव यांनी केला होता. सीबीआयने रकीबूल हसन यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण चौकशी करून आरोपपत्र दाखल केले. झारखंड उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार मुश्‍ताक अहमद यांच्या देखरेखीखाली हे आरोपपत्र दाखल करण्यात आले.

देश

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते धरणाचे उद्घाटन होण्यापूर्वीच तब्बल 389 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले...

01.45 PM

श्रीनगर : भारत पाकिस्तान दरम्यानच्या सीमेलगत अमृतसरनजीक अंजाला सेक्टर येथे घुसखोरीचा डाव सीमा सुरक्षा बलाने (BSF) उधळून लावला....

12.06 PM

पटेल, क्षत्रिय अन्‌ आदिवासी नेतृत्वाचे आव्हान नवी दिल्ली/ अहमदाबाद, ता. 19(यूएनआय) : विकासाच्या कथित राजमार्गावरून "बुलेट'...

07.06 AM