ज्येष्ठ पत्रकार प्रणव रॉय यांच्या निवासस्थानी छापे

वृत्तसंस्था
सोमवार, 5 जून 2017

प्रणव रॉय, राधिका रॉय व आरआरपीआर होल्डिंग्ज या कंपनीने आयसीआयसीआय बँकेचे 48 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - एनडीटीव्हीचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार प्रणव रॉय, त्यांची पत्नी राधिका रॉय व अन्य काही जणांवर केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले आहेत.

बँकेचे नुकसान केल्याचा प्रणव रॉय, त्यांची पत्नी, कंपनीविरोधात दावा आहे. या प्रकरणी सीबीआयने आज (सोमवार) कारवाई करत गुन्हा दाखल केला. यानंतर दिल्लीतील ग्रेटर कैलाश भागातील, डेहराडून येथील निवासस्थानासह चार ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यात काय हाती लागले आहे, याची माहिती सीबीआयकडून देण्यात आलेली नाही.

प्रणव रॉय, राधिका रॉय व आरआरपीआर होल्डिंग्ज या कंपनीने आयसीआयसीआय बँकेचे 48 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
महाराष्ट्र 'बंद' यशस्वी करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
#स्पर्धापरीक्षा - भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'​
भारताचा पाकवर 124 धावांनी दणदणीत विजय​
'दानवेंच्या शेतकऱ्यांसंदर्भातील वक्तव्याचा तपास करा'
मॉन्सूनचे महाराष्ट्रात गुरुवारी आगमन​
मुंबईत भाज्यांच्या किमती भडकल्या