सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; 90.95% निकाल

वृत्तसंस्था
शनिवार, 3 जून 2017

सीबीएसई बारावीचे निकाल 28 मे रोजी जाहीर करण्यात आले होते. आता दहावीचेही निकाल जाहीर झाले आहेत. या परिक्षेसाठी एकूण 16 लाख 67,573 विद्यार्थी बसले होते.

नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या
 दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (शनिवार) सकाळी जाहीर झाला असून, 90.95 टक्के निकाल लागला आहे.

अलाहाबाद, चेन्नई, दिल्ली, डेहराडून आणि तिरुअनंतपुरम विभागातील निकाल आज जाहीर करण्यात आले. या विभागांव्यतिरिक्त इतर विभागांचे निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे, सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्यावर्षी दहावीचा निकाल 96.21 टक्के लागला होता. यंदा तो 90.95 टक्के लागल्याने निकालात टक्के घट झाली आहे.

सीबीएसई बारावीचे निकाल 28 मे रोजी जाहीर करण्यात आले होते. आता दहावीचेही निकाल जाहीर झाले आहेत. या परिक्षेसाठी एकूण 16 लाख 67,573 विद्यार्थी बसले होते.

निकाल खालील संकेतस्थळावर विद्यार्थी पाहू शकतील -
www.results.nic.in
www.cbseresults.nic.in
www.cbse.nic.in

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
ऐतिहासिक शेतकरी संपात 48 तासात फूट; एक गट संपावर ठाम
शेतकरी संपाबाबत घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप : जयाजी सूर्यवंशी​
चोपडा: भाजीपाला फेकला रस्त्यावर
शेतकऱ्यांचा संप मागे; कर्जमाफीसाठी समिती 
शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आश्वासने
शेतकऱ्यांच्या पदरात पडले काय?; किसान सभा असमाधानी
सत्तर टक्के मागण्या मान्य झाल्याने संप मागे: धोर्डे​

मेनका गांधी रुग्णालयात दाखल​