CBSE चा बारावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर; दिल्लीतील रक्षा गोपाल 99.6 टक्‍क्‍यांसह प्रथम

वृत्तसंस्था
रविवार, 28 मे 2017

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) बारावीच्या परिक्षेचा ऑनलाईन निकाल आज (रविवार) जाहीर झाला आहे. CBSE च्या http://cbseresults.nic.in/class12npy/class12th17.htm या अधिकृत संकेतस्थळावर निकाल उपलब्ध झाले आहेत.

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) बारावीच्या परिक्षेचा निकाल आज (रविवार) जाहीर झाला आहे. CBSE च्या http://cbseresults.nic.in/class12npy/class12th17.htm या अधिकृत संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहे.

या परिक्षेत नोएडा येथील अमिटी इंटरनॅशनल शाळेतील रक्षा गोपाल नावाची विद्यार्थीनी 99.6 टक्‍क्‍यांसह सर्वप्रथम आली आहे. तर 99.4 टक्‍क्‍यांसह चंदीगढ येथील भूमी सावंतने दुसऱ्या क्रमांकावर आली असून चंदिगढमधील आदित्य जैनने 99.2 टक्‍क्‍यांसह तिसरा क्रमांक पटकावला आहे. यंदाच्या निकालात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी झाले असून 82 टक्‍क्‍यांवर पोहोचले आहे. मागील वर्षी हे प्रमाण 83.05 टक्के होते.

यंदा देशभरातून CBSE च्या परिक्षेला 10 लाख 98 हजार 891 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 6 लाख 28 हजार 865 मुले होते. एकूण 3 हजार 503 परिक्षा केंद्रावर परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा केवळ ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला आहे.