बंगळूरमध्ये विनयभंग करणारा सीसीटीव्हीमध्ये कैद

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

बंगळूर- बंगळूरमध्ये एका युवतीच्या विनयभंगाचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून संबंधित व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवरून व्हायरल झाला आहे.

बंगळूर- बंगळूरमध्ये एका युवतीच्या विनयभंगाचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून संबंधित व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवरून व्हायरल झाला आहे.

पश्चिम बंगळूरमधील पाचव्या मुख्य रस्त्यावर रविवारी (ता. 1) रात्री अडिचच्या सुमारास विनयभंगाची घटना घडली होती. या व्हिडीओच्या सुरुवातीला ही युवती रिक्षामधून उतरुन आपल्या घराच्या दिशेने जात होती. यावेळी दुचाकीवरून पाठलाग करत आलेल्या दोन युवक तिचा रस्ता अडवतात. यामधील एक युवक खाली उतरून युवतीच्या दिशेने जातो व तिला मिठी मारल्यानंतर चुंबन घेतो. दुचाकीच्या दिशेने तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. युवतीचे कपडे काढण्याबरोबरच तिला दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न करताना ती स्वत:ला वाचवून तेथून पळ काढते. संबंधित चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

स्थानिक युवकाने संबंधित छायाचित्रण प्रसारमाध्यमांकडे पाठविल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. सीसीटीव्हीच्या फुटेजवरून पोलिसांनी कारवाईला सुरवात केली असून दोन युवकांचा शोध घेत आहेत. याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, 31 डिसेंबर रोजी नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या महिला-तरुणींची सर्वांसमोर छेड काढल्याच्या धक्कादायक घटनेनंतर दुसरय़ाच दिवशी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

देश

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा होत असतानाच १५ ऑगस्ट रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की...

07.48 PM

बंगळूर : विरोधी पक्षांवर खोटे गुन्हे दाखल करीत लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा (एसीबी...

07.36 PM

नवी दिल्ली : भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. एका...

01.15 PM