पाककडून शस्त्रसंधीचा भंग; गोळीबार सुरू!

वृत्तसंस्था
शनिवार, 1 ऑक्टोबर 2016

जम्मू - "सर्जिकल स्ट्राईक‘ नंतर भारत आणि पाकिस्तानमधील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानने सीमेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग केला आहे. आज पहाटे साडेतीन वाजता सीमेपलिकडून गोळीबार करण्यात आला. अद्यापही दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच आहे.

जम्मू येथील अख्नूर सेक्‍टरमध्ये आज पहाटे गोळीबारास सुरुवात झाली. सुरुवातीला लहान शस्त्रांनी सुरु झालेला गोळीबारात नंतर मशिनगनचा वापर करण्यात आला. अख्नूर येथील दारकोटे, प्लाटन आणि छाननी देवानू येथील लष्कराच्या तळावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती खोर पोलिस स्थानकाने दिली आहे. या गोळीबारात अद्याप कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे वृत्त आहे.

Web Title: ceasefire by Pakistan on border