नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाककडून गोळीबार

वृत्तसंस्था
रविवार, 1 जानेवारी 2017

पुँछ जिल्ह्यातील गुलपूर सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर गोळीबार केल्याचे वृत्त आहे. या गोळीबारात एक भारतीय जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

श्रीनगर - नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी नऊच्या सुमारास पुँछ जिल्ह्यातील शाहपूर सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. तसेच मोर्टार शेलिंग करण्यात आले. शेर आणि शक्ती या भारतीय चौक्यांना लक्ष्य करण्यात आले. भारतीय जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला.

पुँछ जिल्ह्यातील गुलपूर सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर गोळीबार केल्याचे वृत्त आहे. या गोळीबारात एक भारतीय जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.