शेतकऱ्यांना संजीवनी तर बेरोजगारांना रोजगार

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मार्च 2017

केंद्र सरकारची नव्या 101 साखळी उद्योगांना मंजुरी, साठ हजारांवर रोजगारनिर्मिती

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना बळकटी देत साठ हजारांवर रोजगारनिर्मिती करणाऱ्या 101 साखळी उद्योगांना मंजुरी दिली. हे साखळी उद्योग बिग बास्केट, अमुल, आणि हल्दीराम यासारखे असतील. यासाठी केंद्र सरकार 31 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यामधून फळे व भाजीपाला वाया जाणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. याबाबत केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री हरसिम्रत कौर बादल यांनी माहिती दिली.

अन्नप्रक्रिया मंत्रालयांकडून या साखळी उद्योगांसाठी 838 कोटी रुपये देण्यात येतील, तर उर्वरीत 2,200 कोटी रुपये खासगी क्षेत्रातून घेतले जाणार आहेत. विशेष म्हणजे साखळी उद्योग प्रकल्पामधील सर्वाधिक 21 प्रकल्प महाराष्ट्रामध्ये उभारले जाणार आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश 14, गुजरात 12, आंध्र प्रदेश आठ व मध्य प्रदेशात सहा साखळी उद्योग प्रकल्पांची निर्मिती करण्यात येणार आहे. हे उद्योग प्रकल्प येत्या दोन वर्षांमध्ये उभारले जाणार असून 101 प्रकल्पांमधील 53 उद्योग प्रकल्प फळे व पालेभाज्या, 33 प्रकल्प दुग्ध उत्पादन व डेअरी उद्योग तर उर्वरीत 15 प्रकल्प मांस, कुक्कुटपालन, मत्स्य उत्पादन व्यवसायासंबंधी असणार आहेत.

या साखळी उद्योगांचा देशभरातील दोन लाख 60 हजार शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे बादल यांनी या वेळी सांगितले.