काश्‍मीरमधील युवकांच्या भवितव्याची केंद्राला चिंता केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचे प्रतिपादन 

पीटीआय
शुक्रवार, 8 जून 2018

केंद्र आणि राज्य सरकारने युवकांचे भविष्य सुरक्षित बनविण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. राज्यातील युवकांना सुरक्षित भविष्य उपलब्ध करून देणे, ही आमची जबाबदारी असून, शिक्षणाची ताकद, तसेच खेळाच्या चमत्कारातून काश्‍मिरी युवकांचे भवितव्य बदलू शकते. 
- राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री 

श्रीनगर : केंद्र सरकारने दगडफेकीत सहभागी भरकटलेल्या युवकांना माफ करण्याचा निर्णय घेतला होता; कारण सरकार जम्मू-काश्‍मीरमधील युवकांच्या भवितव्याची केंद्राला चिंता असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे नमूद केले. 

राजनाथसिंह यांचे आज दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी येथे आगमन झाले. या दौऱ्यात ते जम्मू-काश्‍मीरमधील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. ते म्हणाले, की आमच्या मते कोणत्याही भागातील मुलं एकसमान असतात. काही युवकांची दगडफेकीसाठी दिशाभूल करण्यात आली होती, असे आम्हाला वाटते. मुलं चुका करतात. त्यामुळे आम्ही दगडफेकीत सहभागी मुलांना माफ करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय गृहमंत्रालयाने गेल्या वर्षाच्या अखेरीस दगडफेकीत सहभागी युवकांविरुद्ध नोंदविण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले होते. शेरे काश्‍मीर इनडोअर स्टेडियममधील एका कार्यक्रमात त्यांनी युवकांना हिंसाचाराचा मार्ग सोडण्याचे आवाहन केले. 

केंद्र आणि राज्य सरकारने युवकांचे भविष्य सुरक्षित बनविण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. राज्यातील युवकांना सुरक्षित भविष्य उपलब्ध करून देणे, ही आमची जबाबदारी असून, शिक्षणाची ताकद, तसेच खेळाच्या चमत्कारातून काश्‍मिरी युवकांचे भवितव्य बदलू शकते. 
- राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री 

Web Title: Centre concerned about future of Kashmir youth says Rajnath Singh