चाळीसगावच्या पाटेंना "गोल्डन लॉयन' पुरस्कार

चाळीसगावच्या पाटेंना "गोल्डन लॉयन' पुरस्कार

चाळीसगाव : नासा गर्ल स्वीटी पाटे यांचे बंधू अमित पाटे यांच्या कंपनीला कान्स फेस्टिव्हलमध्ये "आर्टिफिशियल इंटेलिजन्स'वर आधारित स्पोर्ट टेक्‍नॉलॉजीसाठी मोबाईल श्रेणीकरिता तब्बल दोन "गोल्डन लॉयन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळविताना त्यांनी गुगल, ऍपल, टोयोटा, ऑडी, वेरिझॉन, पी अँड जी, ऑरेन्ज, नायकी, केएफसी, द टाइम्स आदी नव्वद देशांच्या हजारो नामांकित कंपन्यांना मागे टाकले. 

अमित पाटे यांना मोबाईल टेक्‍नॉलॉजीसाठी "आर्टिफिशियल इंटेलिजन्स' श्रेणीत सादर केलेल्या "स्नॅप्टीव्हिटी' या तंत्रासाठी गोल्डन लायन पुरस्कार प्राप्त झाला. उच्च गतीचे रोबोटिक कॅमेरे खेळपट्टीवर चालविण्याऐवजी क्रीडाप्रेमींवर फोकस करून जिवंत क्रीडा प्रकाराचा त्यांना अनुभव यावा, यासाठी "स्नॅप्टीव्हिटी' हे तंत्र अमित पाटे यांच्या स्नॅप्टीव्हिटी लि. या कंपनीने विकसित केले आहे. 

...असे आहे तंत्रज्ञान 

या नव्या तंत्रज्ञानामुळे क्रीडा किंवा संगीतप्रेमी आपल्या महत्त्वाच्या क्षणांना आठवणीत साठवून ठेवू शकतात. याशिवाय थेट क्रीडा किंवा संगीत कार्यक्रमांतही एकाचवेळी सहभागी होऊ शकतात. विशेष म्हणजे त्यांच्या समुदायाचा एक भाग बनणे त्यांना शक्‍य होते. 

या स्टेडियमनी स्वीकारले तत्रज्ञान 

एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंड, वेम्बली स्टेडियम, एतिहाद स्टेडियम (मॅनकेटी एफसी) आणि ऑरेंज वेलॉड्रोम (फ्रान्स) यांसारख्या जगातील अग्रगण्य स्टेडियम्सने "स्नॅप्टीव्हिटी' तंत्रज्ञान अंगीकारले आहे. अमित पाटे यांच्या कंपनीने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com