हनीप्रीत इन्सान मोस्ट वॉंटेड यादीत

वृत्तसंस्था
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

चंडीगड : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर हरियानात उसळलेल्या हिंसाचार आणि हत्या प्रकरणी मोस्ट वॉंटेड 43 जणांची यादी हरियाना पोलिसांनी जाहीर केली आहे. यात राम रहीमची मानलेली मुलगी हनीप्रीत इन्सानचे नाव सर्वांत वर आहे.

डेरा सच्चा सौदाचा प्रवक्ता आदित्य इन्सानचे नावदेखील मोस्ट वॉंटेड यादीत आहे. हनीप्रीत आणि आदित्य फरार आहेत. हनीप्रीतच्या विरुद्ध लुकआऊट नोटीसही बजावण्यात आली आहे. हनीप्रीतच्या शोधासाठी नेपाळलगत असलेल्या बिहारच्या जिल्ह्यात तपास सुरू आहे. तिचे पोस्टरही ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर सरकारी मालमत्तेची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली होती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही लक्ष्य करण्यात आले होते. अनेक चॅनेलच्या ओबी व्हॅन जाळण्यात आल्या होत्या. हिंसाचारानंतर राज्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती.