हनीप्रीत इन्सानविरुद्ध हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

चंडीगड: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला शिक्षा सुनावल्यानंतर हरियानात हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी हनीप्रीत इन्सानविरुद्ध हरियाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डेरा सच्चा सौदाच्या प्रमुखाने मानलेली मुलगी हनीप्रीतच्या विरुद्ध सेक्‍टर 5 पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी हनीप्रीतचा चालक प्रदीप गोयलने एसआयटी चौकशीत महत्त्वाची माहिती दिली आहे.

हनीप्रीतच्या तपासार्थ मंगळवारी नेपाळच्या अनेक भागात छापेमारी करण्यात आली. या कारवाईत हरियाना पोलिस आणि नेपाळ पोलिसचे कर्मचारी सहभागी झाले होते. नेपाळच्या इटहरी आणि रूपनदेवी जिल्ह्यातील बुटवल भागात पोलिसांनी छापे घातले. प्रसारमाध्यमाच्या वृत्तानुसार पंचकुलातील हिंसाचारानंतर हनीप्रीत नेपाळला पळून गेल्याचे आरोप प्रदीपने म्हटले आहे. नेपाळला जाण्यापूर्वी ती प्रदीपच्या संपर्कात होती. प्रदीपला पोलिसांनी राजस्थानच्या लक्ष्मणगड येथून ताब्यात घेतले. प्रारंभी चौकशीत प्रदीपच हनीप्रीतला रोहतक आणि अन्य ठिकाणी घेऊन गेला होता.