कार्ती चिदंबरमविरुद्ध आरोपपत्र दाखल

पीटीआय
गुरुवार, 14 जून 2018

एअरसेल-मॅक्‍सिस आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज दिल्लीच्या एका न्यायालयात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. 

नवी दिल्ली : एअरसेल-मॅक्‍सिस आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज दिल्लीच्या एका न्यायालयात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. 

अतिरिक्त सत्र न्यायाधीश रुबी अलका गुप्ता यांनी, या आरोपपत्रावर 4 जुलै रोजी विचार करू, असे सांगितले. आरोपपत्रात मनी लॉंडरिंग प्रतिबंध कायद्याच्या कलम चार अंतर्गत कार्ती यांच्याशिवाय अन्य चार लोकांच्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे आणि 2012 मध्ये अनुक्रमे केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाद्वारे दाखल दोन प्रकरणात कार्ती यांना दहा जुलैपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. हे प्रकरण एअरसेलमध्ये गुंतवणुकीसाठी मेसर्स ग्लोबल कम्युनिकेशन होल्डिंग सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला देण्यात आलेल्या परकी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या परवानगीशी संबंधित आहे. 
 
पी. चिदंबरम यांच्या नावाचाही उल्लेख 
ईडीने आरोपपत्रात अनेक ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. मात्र, त्यांना या प्रकरणात आरोपी बनविण्यात आलेले नाही. याप्रकरणी ईडी पुरवणी आरोपपत्रही दाखल करण्याची शक्‍यता आहे. 
न्यायालयाने टूजी स्पेक्‍ट्रम प्रकरणाशी संबंधित एअरसेल-मॅक्‍सिस प्रकरणात 2011 

Web Title: Chargesheet filed against Karti Chidambaram