कमल हसन यांच्यावर 100 कोटींचा दावा?

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

"बिग बॉस'प्रकरणी बिनशर्त माफीची मागणी

चेन्नई:  अभिनेते कमल हसन सध्या तामीळ वाहिनीवर सुरू असलेल्या "बिग बॉस'चे सूचसंचालक आहेत. या कार्यक्रमात झोपडपट्टीवासीयांच्या भावना दुखावणारे विधान करण्यात आल्याने तमिळनाडूतील पुथिया तमिझंगम (पीटी) या राजकीय पक्षाने कमल हसन व खासगी दूरचित्रवाहिनीला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांत बिनशर्त माफी न मागितल्यास त्यांच्यावर 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

"पीटी'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. के. कृष्णसामी यांनी ही माहिती रविवारी (ता.30) दिली. कमल हसन यांच्यासह "बिग बॉस'मधील सहभागी अभिनेता गायत्री रघुराम, "इंडेमोल शाईन इंडिया' या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक दापक धर. "स्टार विजय' टीव्हीचे सरव्यवस्थापक अजय विद्या सागर यांनाही नोटीस बजावली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या शोमध्ये गायत्री रघुराम यांनी एका महिला सहकलाकाराला उद्देशून "झोपडपट्टीतील लोकांसारखे ती वागते', असे विधान केले होते. विशिष्ट समाजातील लोकांच्या भावना दुखविणारे हे विधान वाहिनेने संपादित करायला हवे होते, अशी अपेक्षा कृष्णसामी यांनी व्यक्त केली.

हा कार्यक्रम प्रदर्शित होऊन दोन आठवडे उलटले तरी गायत्री रघुराम, कमल हसन किंवा वाहिनीनेही याबद्दल माफी मागितलेली नाही. पुढील सात दिवसांत त्यांनी माफी मागावी; अन्यथा 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा उच्च न्यायालयात दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला.