'सीआरपीएफ'च्या जवानास विनयभंगप्रकरणी अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

रायपूर: छत्तीसगडमधील निवासी शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाला राज्य पोलिसांनी अटक केली, तर अन्य एका जवानाची ओळख पटली आहे. या दोघांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील पालनर येथील सरकारी निवासी शाळेत राखीपौर्णिमेनिमित्त 31 जुलै रोजी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी हा प्रकार घडला. संबंधित मुलीचा जबाब आणि कार्यक्रमाच्या छायाचित्रांमधून दोघांची ओळख पटली, अशी माहिती दंतेवाडाचे पोलिस अधीक्षक कामलोचन कश्‍यप यांनी दिली. "सीआरपीएफ'च्या 231 बटालियनचा कॉन्स्टेबल शमीम अहमद (वय 31) याला अटक करण्यात आली. दुसऱ्या जवानाचीही ओळख पटली असून, तो सध्या सुटीवर आहे. पोलिस त्याच्या शोध घेत आहे. दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दंतेवाड्याचे पोलिस उपमहानिरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली बालिका आश्रम मुलींच्या सरकारी शाळेचे प्रतिनिधी व महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.