चीनमध्ये युरोपच्या लोकसंख्येएवढे इंटरनेट युजर्स!

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

चीनमध्ये स्मार्टफोन्स व इंटरनेटच्या माध्यमामधून आर्थिक व्यवहार केलेल्या नागरिकांची संख्या 46.9 कोटी इतकी असल्याचे निष्पन्न झाले आहे. डाऊनलोड करण्यात आलेल्या "ऍप्स'मध्ये ऑनलाईन म्युझिक व व्हिडिओ, ऑनलाईन पेमेंट्‌ससंदर्भातील मोबाईल ऍप्लिकेशन्सचे प्रमाण सर्वाधिक आहे

नवी दिल्ली - चीनमध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ही गेल्या वर्षात 6.2 टक्‍क्‍यांनी वाढून सुमारे 70 कोटी 31 लाख इतकी झाली आहे. चीनमध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांचा हा आकडा युरोपच्या एकूण लोकसंख्येएवढा आहे! चीनमधील सरकारी मालकीचे वृत्तपत्र असलेल्या "ग्लोबल टाईम्स'ने यासंदर्भातील एका अहवालाचा दाखला देत हे वृत्त दिले.

देशात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ही 2016 या वर्षात सुमारे 4.2 कोटींनी वाढली. चीनच्या एकूण लोकसंख्येपैकी 53.2 % नागरिक आता इंटरनेट वापरत असल्याचे या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. स्मार्टफोन्सचा प्रचंड प्रमाणात वाढलेला वापर, हे एकंदर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढण्यामागील एक प्रमुख कारण असल्याचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शांघायमधील तज्ज्ञ ली यी यांनी सांगितले.

इंटरनेट वापरणाऱ्या नागरिकांमध्ये स्मार्टफोन वापरणाऱ्यांचे प्रमाण 95.1 इतके प्रचंड असल्याचे आढळून आले आहे. 2015 मध्ये हे प्रमाण 90.1 % इतके होते.

याचबरोबर, इंटरनेटच्या माध्यमामधूनच आर्थिक व्यवहार करणाऱ्या नागरिकांच्या संख्येतही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 31.2 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. चीनमध्ये स्मार्टफोन्स व इंटरनेटच्या माध्यमामधून आर्थिक व्यवहार केलेल्या नागरिकांची संख्या 46.9 कोटी इतकी असल्याचे निष्पन्न झाले आहे. डाऊनलोड करण्यात आलेल्या "ऍप्स'मध्ये ऑनलाईन म्युझिक व व्हिडिओ, ऑनलाईन पेमेंट्‌ससंदर्भातील मोबाईल ऍप्लिकेशन्सचे प्रमाण सर्वाधिक आहे.

याचबरोबर, अन्न मागविण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या मोबाईल ऍप्सच्या युजर्सचे 2016 या वर्षात तब्बल 83.7 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे या अहवालात म्हटले आहे. या माध्यमामधून अन्न मागविणाऱ्या नागरिकांच्या संख्येत तब्बल 20.86 कोटींनी वाढ झाली आहे.

चीनमध्ये इंटरनेट वापरणाऱ्या नागरिकांमध्ये तब्बल 27% हे ग्रामीण भागामधील आहेत.

देश

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा होत असतानाच १५ ऑगस्ट रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की...

02.06 PM

नवी दिल्ली : भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. एका...

01.15 PM

रायपूर (छत्तीसगड) : रायपूरमधील दुर्ग जिल्ह्यात सरकारी गोशाळेतील 110 गायींचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उडकीस आली...

12.21 PM