मसूद प्रकरणावरून भारत-चीन पुन्हा आमनेसामने

Masood Azhar
Masood Azhar

नवी दिल्ली - जैश- ए- मुहम्मद संघटनेचा प्रमुख मसूद अझर याचा दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्याच्या कारणावरून भारत व चीन पुन्हा एकदा एकमेकांसमोर आले असून, भारताने संयुक्त राष्ट्र संघात (यूएन) मांडलेल्या प्रस्तावास चीनने पुन्हा आपला विरोध दर्शवला आहे. चीनच्या या भूमिकेवर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

पठाणकोट हल्ल्यामागील मास्टर माइंड मसूद अझर याचा समावेश आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत करावा, अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्र संघात (यूएन) लावून धरली आहे. मार्च 2016 मध्ये भारताने प्रथम याबाबतचा प्रस्ताव यूएनमध्ये मांडला होता, त्यास आक्षेप घेत चीनने आडमुठे धोरण स्वीकारले आहे. 

भारताने केलेल्या मागणीसंदर्भात विविध अंगाने विचार करण्याची गरज असून, आपल्या भूमिकेमुळे संबंधितांना तशी चर्चा अथवा विचार करण्याची संधी मिळणार असल्याचे चीनने आपला बचाव करताना म्हटले होते. मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केल्यास त्याची सर्व संपत्ती जप्त होऊ शकते, तसेच त्याच्या परदेश दौऱ्यांवरही मर्यादा पडणार आहेत. 

अपेक्षा फोल ठरली 
भारताने मसूदबाबत केलेल्या मागणीला विरोध करणे, हा प्रकार चीनकडून यापूर्वीही झालेला असून, कदाचित चीनने या प्रकरणाबरोबर भारताची भूमिका समजून घेतली असेल, अशी अपेक्षा आम्हाला होती. मात्र, ती फोल ठरली, अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे. 

दहशतवादाची झळ चीनलाही बसली असून, मसूदप्रकरणी चीनने घेतलेली भूमिका ही आश्‍चर्यास्पद आहे. 
विकास स्वरूप, परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com