निरोप समारंभात सरन्यायाधीशांना अश्रू अनावर

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर हे आज सेवानिवृत्त झाले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात त्यांना अश्रू अनावर झाले.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर हे आज सेवानिवृत्त झाले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात त्यांना अश्रू अनावर झाले.

न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्‍त्या होत नसल्याने यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात ठाकूर यांना अश्रू अनावर झाले होते. त्यावेळी त्यांनी न्यायाधीशांविना अनेक खटले प्रलंबित असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. आज त्यांच्या निरोप समारंभातही त्यांनी न्यायव्यवस्थेसमोरील आव्हानांचा आढावा घेतला. जुन्या आठवणींना उजाळा देत अत्यंत भावपूर्ण अवस्थेत ते म्हणाले, "याच ठिकाणी मी आजपर्यंत 28 निरोप समारंभांना उपस्थित होतो. आज माझा स्वत:चाच निरोप समारंभ आहे. 10 वर्षे काम केल्यानंतर मी बंगळूरमधून बाहेर आलो. त्यावेळी अनेकांना डोळ्यात अश्रू उभे राहिले होते.'

वकिली केल्यानंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांपर्यंतचा प्रवास खडतर होता, असे त्यांनी सांगितले. न्यायालयातील प्रलंबित खटले वेगाने निकाली काढण्यासाठी असलेल्या आव्हानांची त्यांनी जाणीव करून दिली. ते म्हणाले, "रिक्तपदांची भरती आणि पायाभूत सुविधा हे मोठे आव्हान आहे. आपल्याकडे 8 कोटी प्रकरणे प्रलंबित आहेत. आपल्याला ती निकाली काढायची आहेत. आपल्याला भविष्यातील अडचणींनाही सामोरे जायचे आहे.' उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, "तुमच्यासमोर असलेले प्रत्येक प्रकरण हे एक आव्हान असते. जोपर्यंत समाजात शांतता पसरत नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होऊ शकत नाही.' निवृत्तीनंतरही न्यायसंस्थेसाठी निरीक्षकाच्या स्वरुपात आपले योगदान सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

देश

जनता बेहाल; नेत्यांकडून परस्परांवर आरोप प्रत्यारोप पाटणा: बिहारमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात आतापर्यंत तीनशे जणांचा बळी...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर नाराजी कोलकाता: सर्वोच्च न्यायालयाने "तोंडी तलाक'ची प्रथा बेकायदा ठरविण्याचा ऐतिहासिक निकाल...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाच्या कार्यालयासाठी राजधानीतील मध्यवर्ती भागात बंगला देण्याचा निर्णय मागे घेण्याचा आदेश नायब राज्यपालांनी...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017