गुंडानो उत्तर प्रदेश सोडा- योगी आदित्यनाथ

yogi adityanath
yogi adityanath

वाराणसी- उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार गुंडगिरी चालून घेणार नाही. गुंडानो उत्तर प्रदेश सोडा, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतल्यानंतर कामांचा धडाका सुरू केला आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था, ग्रामीण विकास व शिक्षणांसह सर्वच मुद्द्यांवर बोट ठेवत संबंधित विभागांना सूचना केल्या आहेत. गेल्या 150 तासात त्यांनी विविध 50 महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

योगी आदित्यनाथ म्हणाले, 'आमचे सरकार हे भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. राज्यात तुम्हाला कुठे भ्रष्टाचार होताना दिसून आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा. यावर मी काय करतो ते नंतर बघा. राज्यातील मंत्र्यांनी कोणत्याची कामाचे ठेके घेऊ नयेत. भ्रष्टाचार व गुंडगिरी संपवून राज्याला विकासाकडे घेऊन जाणार आहे.'

योगी आदित्यनाथ यांनी घेतलेले 50 निर्णय-

  1. कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या भाविकांना एक लाख रुपये अनुदान
  2. 15 जूनपर्यंत सर्व रस्ते खड्डेमुक्त करा
  3. अँटी रोमियो पथक
  4. ज्या भागात छेडछाड होईल, त्याच भागातल्या अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल
  5. तरुण-तरुणी त्यांच्या संमतीने सोबत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करु नये
  6. एखादी तक्रार मिळताच पोलिसांना तातडीने एफआयआर दाखल करावा
  7. पोलिसांचे सामान्यांशी वर्तन सभ्य असावे
  8. तक्रार करण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी पोलिस स्टेशनमध्ये पाणी आणि बसण्याची व्यवस्था असावी
  9. पोलिस स्टेशनमध्ये एक महिला पोलिस व एक पोलिस निरीक्षक कायम असावा
  10. पोलिस स्टेशनमध्ये सर्व आवश्यक सुविधा असाव्यात
  11. महिला पोलिसांना आवश्यक सुविधा मिळाव्यात
  12. राज्यात महिला पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असावी
  13. सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी नियमावली तयार
  14. राज्यातील सरकारी कार्यालयांमध्ये पान-गुटखा खाण्यास मनाई
  15. राज्यातील सरकारी कार्यालयांमध्ये पॉलीथिन वापरण्यावर बंदी
  16. सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छता असावी
  17. प्रत्येक फाईलची तातडीने विल्हेवाट लावावी
  18. नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी समजतील असे नियम
  19. सरकारी कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी
  20. सरकारी कार्यालयांमध्ये प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे
  21. मंत्र्यांनी विभागाशी संबंधित कोणतीही फाईल घरी नेऊ नये
  22. मंत्र्यांनी त्यांच्या कामाचा साप्ताहिक अहवाल सादर करावा
  23. सर्व मंत्र्यांनी 27, 28 आणि 29 मार्चला त्यांनी केलेल्या कामाचे सादरीकरण करावे
  24. एखाद्या ठिकाणी विद्युतरोहित्र जळाले असेल, तर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी स्वतः जाऊन आढावा घ्यावा आणि नवीन विद्युतरोहित्र द्यावे.
  25. गायींच्या तस्करीवर बंदी
  26. अवैध कत्तलखाने तातडीने बंद करा
  27. राजकीय नेत्यांना दिलेल्या सुरक्षेचा आढावा
  28. अधिकारी-मंत्र्यांनी त्यांची सपत्ती जाहीर करावी
  29. संपत्तीविषयक माहिती 15 दिवसात द्यावी
  30. मंत्री आणि अधिकाऱ्यांनी सकाळी 10 वाजता मंत्रालयात हजर रहावे
  31. अधिकाऱ्यांनी भाजपच्या जाहिरनाम्याप्रमाणे योजना तयार कराव्यात
  32. नवरात्री, राम नवमीच्या काळात 24 तास वीज
  33. नवरात्रीच्या काळात भक्तांना सोयीसुविधा मिळाव्यात
  34. राम नवमीच्या काळात अयोध्येत मुलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात
  35. प्रत्येक गावागावात वीज पोहचवण्यासाठी आराखडा
  36. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी नियमित कामावर हजर रहावे
  37. स्वस्त दरात औषधे मिळण्यासाठी नवीन 3 हजार मेडिकल सुरु करणार
  38. रुग्णांना त्यांच्या समस्या नोंदवता याव्यात, यासाठी आरोग्य विभागाने अॅप तयार करावं
  39. झासी, मेरठ, गोरखपूर, आग्रा, अलाहाबादमध्ये मेट्रो
  40. शेतकऱ्यांकडून गव्हाची हमीभावाने खरेदी
  41. छत्तीसगडच्या धर्तीवर शेतीमालाची खरेदी
  42. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकीत रक्कम 14 दिवसात द्यावी
  43. सर्व सहकारी समित्या पुन्हा कार्यान्वित होणार
  44. चांगल्या कंत्राटदारांनाच सरकारी काम
  45. गृहनिर्माण विभागाने पंतप्रधान आवास योजनेच्या कामाला लागावे
  46. शिक्षण क्षेत्रात शिक्षकांनी गुरु-शिष्य ही परंपरा कायम ठेवावी
  47. शिक्षकांनी कामावर असताना टी-शर्ट घालू नये
  48. शिक्षकांनी शाळेत असताना मोबाईल फोन वापरणं टाळावे
  49. रस्त्याचं जाळं प्रत्येक गावापर्यंत पोहचावे
  50. दुष्काळ, पूर अशा नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सज्ज रहावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com