भाजपची स्त्रियांबद्दलची मानसिकता समजते- प्रियांका

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जानेवारी 2017

नवी दिल्ली- भारतीय स्त्रियांकडे पाहण्याची भाजपची मानसिकता कशी आहे हे कटियार यांच्या विधानावरून दिसून येते, अशी प्रतिक्रिया प्रियांका गांधी यांनी व्यक्त केली आहे. 

उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय झालेल्या प्रियांका गांधी यांच्याबद्दल उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय कटियार यांनी खळबळजनक वक्तव्य केल्याने नवा वाद सुरू झाला आहे. 'भाजपकडे प्रियांकापेक्षा सुंदर चेहरे आहेत,' असे विधान कटियार यांनी केले. 

(संबंधित व्हिडिओ येथे पाहा)

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्टार प्रचारक म्हणून काँग्रेसने प्रियांका गांधी यांना समोर आणले आहे. याबाबत विचारले असता कटियार म्हणाले, "प्रियांका गांधींपेक्षा अधिक सुंदर महिला आहेत.. त्यांच्यापेक्षा सुंदर महिला भाजपकडे आहेत. जेवढे प्रियांका गांधींना सुंदर म्हटले जाते तेवढ्या त्या सुंदर नाहीत."

"आमच्याकडे स्मृती इराणी आहेत. त्या जिथे जातात तिथे गर्दी होऊ लागते. त्या प्रियांकापेक्षा अधिक चांगले भाषण देतात," असे कटियार म्हणाले. 
 
व्हिडीओ गॅलरी