ऍम्बेसेडरचा ब्रॅंड आता प्युजो कंपनीकडे

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

कोलकता: एकेकाळी सत्तेचे प्रतीक समजली गेलेल्या आणि सामान्यांच्याही आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या ऍम्बेसेडरचा ब्रॅंड फ्रान्समधील प्युजो या मोटार उत्पादन कंपनीने 80 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. सी. के. बिर्ला यांच्या हिंदुस्तान मोटर्सकडे आतापर्यंत मालकी असलेल्या ऍम्बेसेडरचे तीन वर्षांपासून उत्पादन थांबविण्यात आले आहे.

"प्युजो कंपनीला ऍम्बेसेडरचा ब्रॅंड आणि ट्रेडमार्क विकण्याचा करार झाला आहे. या करारातून मिळालेल्या पैशातून कर्मचारी आणि देणेकरी यांचे थकीत वेतन तसेच देणी चुकविण्यात येणार आहेत,' असे बिर्ला ग्रुपच्या प्रवक्‍त्यांनी सांगितले. या करारानंतर, प्युजो कंपनी ऍम्बेसेडर या ब्रॅंडचा वापर भारतात मोटार विक्रीसाठी करणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हिंदुस्तान मोटर्सने सुमारे सात दशकांपूर्वी मॉरीस ऑक्‍सफोर्ड 2 (लॅंडमास्टर) मध्ये थोडे बदल करून ती ऍम्बेसेडर या नावाने भारतीय रस्त्यांवर उतरवली होती. यानंतर अनेक दशके ही मोटार प्रतिष्ठेचे आणि रुबाबाचे प्रतीक बनले होते.

ऍम्बेसेडरचा प्रवास

  • 1958 : उत्पादन सुरू
  • 1980 चे दशक : 24 हजार गाड्या प्रतिवर्ष
  • 2013-14 : 2,439 गाड्या प्रतिवर्ष
  • 2014 अखेर : दररोज केवळ पाच गाड्या
टॅग्स