'फॉर्मेलिन'च्या चर्चेसाठी काँग्रेस ठाम 

The Congress Aggressive for formalinThe Congress Aggressive for formalin
The Congress Aggressive for formalinThe Congress Aggressive for formalin

पणजी : राज्यात आयात होणाऱ्या मासळीत फॉर्मेलिन असल्याचे सिद्ध झाल्याने ते आरोग्यास धोकादायक आहे त्यामुळे स्थगन प्रस्ताव चर्चेसाठी प्राधान्यक्रमाने घेण्याची पुन्हा जोरदार मागणी आज विरोधीपक्ष कॉंग्रेसने अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रश्‍नोत्तराच्या तासावेळी केली. कालचा स्थगन प्रस्ताव आज चर्चेसाठी घेण्यास सभापतींनी नकार दिल्याने सरकार लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याबाबत कॉंग्रेसने सभागृहात आरोप केला. 

प्रश्‍नोत्तर कामकाजात विरोधकांनी अडथळे आणल्याने सभापतींनी दोनवेळा कामकाज तहकूब केल्याने दुसऱ्या दिवशीही कामकाज होऊ शकले नाही. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रश्‍नोत्तराचा तास सुरू होताच मुख्यमंत्र्यांनी आजच्या कामकाजमधील काही प्रश्‍नांच्या उत्तरातील बदलाच्या सूचना केल्यानंतर सभापतींनी आमदार राजेश पाटणेकर यांना प्रश्‍न विचारण्यास सांगितले. त्यांनी प्रश्‍न विचारल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्याचे उत्तर पटलावर ठेवण्यात आल्याचे सांगितले. यावेळी विरोधी पक्षनेते चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांच्यासह कॉंग्रेस आमदारांनी कालच्या स्थगन प्रस्तावावर आजही पुन्हा चर्चा घेण्याची मागणी केली.

सभापतींनी प्रस्तावावर चर्चा घेतली नाही त्यामुळे कालचा कामकाजाचा वेळ वाया गेला व आजही तसे न करण्याची विनंती त्यांनी केली. काल विरोधकांना या प्रस्तावावर लक्षवेधी सूचनेवेळी विषय मांडण्यास संधी होती ती त्यांनी गमावली. 

येत्या सोमवारी (23 जुलै) लक्षवेधी सूचना ठेवण्यात आली आहे त्यामुळे आजही कामकाजाचा वेळ वाया घालवू नका असे सभापतींनी वारंवार सांगितले. विरोधक त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नव्हते.

सुमारे पंधरा मिनिटे सभापती व विरोधक यांच्यामध्ये हा स्थगन प्रस्ताव चर्चेस घेण्यावरून गोंधळ उडाल्याने अखेर सभापतींनी प्रश्‍नोत्तर व शून्य तासाचे कामकाज दुपारी 2.30 पर्यंत तहकूब केले. दुपारी 2.30 वा. कामकाज सुरू होताच पुन्हा कॉंग्रेसने स्थगन प्रस्तावावर चर्चेसाठी मागणी करून सभापतींच्या हौदासमोर धाव घेतल्याने आजच्या दिवसभराचे कामकाज सभापतींनी सोमवारी (23 जुलै) सकाळी 11.30 पर्यंत तहकूब केले. 

फॉर्मेलिन हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो फक्त कॉंग्रेसच्या 16 आमदारांपुरता नाही राज्यातील 15 लाख गोमंतकियांच्या आरोग्याशी संबंधित आहे. त्यामुळे त्यावर प्राधान्यक्रमाने चर्चा व्हायला हवी. सभागृहातील सर्व आमदारांनी त्याला पाठिंबा द्यायला हवा, असे कवळेकर यांनी बाजू मांडली.

सभापती विरोधी पक्षाचा आवाज दाबू शकत नाहीत. यावेळी आमदार लुईझिन फालेरो व आमदार आलेक्‍स रेजिनाल्ड तसेच आमदार चर्चिल आलेमांव यांनीही भाग घेऊन स्थगन प्रस्ताव चर्चेस घेण्याची मागणी केली. कालचा स्थगन प्रस्ताव आज कामकाजात चर्चेसाठी घेता येत नाही असे सांगून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभा कामकाज नियमानुसार विरोधकांनी आज नव्याने प्रस्ताव मांडायला हवा होता असे स्पष्टीकरण दिले व सभापतींनीही ते आज घेता येणार नाही असे स्पष्ट केले. त्यावर आक्रमक बनलेल्या विरोध पक्षनेते कवळेकर यांनी फॉर्मेलिनचा वापर करून मासळी घेऊन गोव्यात आलेले सतरा ट्रकांविरुद्ध काय कारवाई केली तसेच कामकाजाच्या नियमावर बोट ठेवून गोव्याच्या जनतेच्या आरोग्याशी 
खेळू नका असे ते म्हणाले म्हणाले.

नियमाबाहेर जाऊन या प्रस्तावावर चर्चा घेण्याचे अधिकार सभापतींना आहेत. खासगी ठरावाचा दिवस असल्याने सभापतींनी प्रश्‍नोतराचा तास स्थगित करून या प्रस्तावावर चर्चा घ्यावी अशी जोरदार मागणी विरोधकांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com