मासळीत फॉर्मेलीन सापडल्याचा काँग्रेसचा दावा

Congress
Congress

मडगाव- गोवा येथील एसजीपीडीए मार्केटमध्ये केलेल्या चाचणीत मासळीमध्ये फाॅर्मेलीन या घातक द्रव्याsचे अंश सापडल्याचा दावा काॅंग्रेसने केला आहे. काॅंग्रेसचे नेते व कायर्कर्त्यांनी आज सकाळी मार्केटमधील मासळीची तपासणी केली.

या मोहिमेत  रेजिनाल्ड लाॅरेन्स, नीळकंठ हळर्णकर, क्लाफास डायस, विल्फ्रेड डिसा यांच्यासह काॅंग्रेसचे गोवा प्रभारी डाॅ. ए. चेल्लाकुमार, गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, उपाध्यक्ष एम. के. शेख,  गोवा प्रदेश महिला काॅंग्रेसच्या अध्यक्ष अॅड. प्रतिमा कुतिन्हो यांचा सहभाग होता.

मासळीतील फाॅर्मेलीनचा विषय काॅंग्रेसने सातत्याने लावून धरला अाहे. नागरिकांमध्ये या विषयावर जागृती व्हावी या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली. या प्रकरणी मत्स्योद्योगमंत्री विनोद पालयेकर यांची 24 सप्टेंबर रोजी भेट घेण्यात येणार आहे, अशी माहिती शेख यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com