'मोदींचा उपवास म्हणजे सोंगातून प्रसिद्धी' 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पंतप्रधान आणि भाजप नेतृत्व उपवासाचे सोंग घेऊन प्रसिद्धी मिळविण्याच्या तयारीत आहे. मात्र, भाजपने विरोधात असताना संसद चालू दिली नाही आणि आता सत्तेत असतानाही चालू देत नसल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. 

नवी दिल्ली : संसद न चालण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या आज (गुरुवार) होणाऱ्या उपोषणावर कॉंग्रेसने टीकास्त्र सोडले आहे.

पंतप्रधान आणि भाजप नेतृत्व उपवासाचे सोंग घेऊन प्रसिद्धी मिळविण्याच्या तयारीत आहे. मात्र, भाजपने विरोधात असताना संसद चालू दिली नाही आणि आता सत्तेत असतानाही चालू देत नसल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. 

कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांशी बोलताना सत्ताधारी भाजपच संसदेच्या कामकाजात अडथळा आणून अविश्‍वास प्रस्तावावर चर्चा होऊ देत नसल्याचा आरोप केला. संसदेचे अडीचशे तास वाया घालवले आणि प्रचंड बहुमत असूनही लोकसभेचे कामकाज फक्त एक टक्का काळ चालवले. आता उपवासाचे सोंग रचले जात आहे. आता उपवासाची वेळ नसून सरकारच्या अपयशामुळे पंतप्रधानांनी संन्यास घेण्याची वेळ आली आहे, असाही सल्ला सुरजेवाला यांनी दिला. 

Web Title: Congress criticize Narendra Modi fast