भैय्यूजी महाराजांच्या आत्महत्येची 'सीबीआय' चौकशी व्हावी : काँग्रेस

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जून 2018

''माझ्यावर असलेला तणाव सहन न झाल्याने मी आत्महत्या करत आहे'', असे आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाइड नोटमध्ये भैय्यूजी महाराजांनी म्हटले आहे.

इंदूर : राष्ट्रसंत भैय्यूजी महाराजांच्या आत्महत्येची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली. भैय्यूजी महाराज यांच्याकडे भाजपने अनेक कामे सोपवली होती. भाजपने सोपवलेली कामे पूर्ण करून घेण्यासाठी सतत पाठपुरावा केला जात होता. त्यामुळे भैय्यूजी महाराज तणावात होते, असा आरोप काँग्रेसने केला.

भैय्यूजी महाराजांनी आज (मंगळवार) दुपारी इंदूर येथील त्यांच्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्यानंतर भैय्यूजी महाराजांनी ''माझ्यावर असलेला तणाव सहन न झाल्याने मी आत्महत्या करत आहे'', असे आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील शिवराजसिंह सरकारने आम्ही तुम्हाला सगळ्या सुविधा पुरवतो. तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीमुळे भैय्यूजी महाराज तणावाखाली होते, असा आरोप काँग्रेस नेते मानक अग्रवाल यांनी केला. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी केली जावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Congress Demanded CBI Inquiry Suicide of Bhaiyyuji Maharaj