काँग्रेसला सर्वसमावेशी आणि सामुहिक नेतृत्वाची गरज; जी-२३ नेत्यांच्या बैठकीत चर्चा

काँग्रेसला सर्वसमावेशी आणि सामुहिक नेतृत्वाची गरज; जी-२३ नेत्यांच्या बैठकीत चर्चा

नवी दिल्ली: काँग्रेसच्या 'जी-२३' नेत्यांनी काल बुधवारी बैठक घेऊन चर्चा केली आहे. अलिकडेच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर जी-२३ नेत्यांनी ही बैठक आयोजित केली होती. पक्षाला पुढे जाण्यासाठी एका सामुहिक आणि सर्वसमावेशक अशा नेतृत्वाची गरज असल्याचं या नेत्यांनी बोलून दाखवलं.

काँग्रेसला सर्वसमावेशी आणि सामुहिक नेतृत्वाची गरज; जी-२३ नेत्यांच्या बैठकीत चर्चा
रोजगारनिर्मितीचे भारतकेंद्रित मॉडेल राबवा

त्यांनी आपल्या एका वक्तव्यात असं देखील म्हटलं की, पुढील लोकसभा निवडणुकीसाठी एक विश्वासार्ह पर्याय लोकांसमोर सादर करण्यासाठी समविचारी पक्षांसोबत चर्चा आतापासूनच सुरु केली पाहिजे. राज्यसभेचे माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या घरी झालेल्या या बैठकीमध्ये आझाद यांच्याशिवाय कपिल सिब्बल, आनंद शर्मा, मनीष तिवारी, शशी थरुर, शंकर सिंह बाघेला, पृथ्वीराज चव्हाण, भूपेंद्र सिंह हुड्डा, राज बब्बर, मणिशंकर अय्यर, पी जे कुरियन, राजेंद्र कौर भट्टल, कुलदीप शर्मा, परनीत कौर आणि एम ए खान देखील सामील होते. या बैठकीत अय्यर यांचं येणं विशेष मानलं जातंय कारण ते गांधी कुटुंबियांचे जवळचे मानले जातात.

काँग्रेसला सर्वसमावेशी आणि सामुहिक नेतृत्वाची गरज; जी-२३ नेत्यांच्या बैठकीत चर्चा
विमान प्रवास महागण्याची चिन्हे; इंधनाच्या किंमतीत १८ टक्के वाढ

या बैठकीनंतर या नेत्यांनी म्हटलंय की, आम्ही काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि पक्षाच्या नेत्यांनी सोडून जाण्याच्या बाबींबाबत विचारविमर्श केला. आम्हाला असं वाटतं की, काँग्रेसला पुढे जायचं असेल तर एक सामुहिक आणि सर्वसमावेशक असं नेतृत्व आपलंसं करायला हवं तसेच प्रत्येक स्तरावर निर्णय घेतला जावा. तसेच त्यांनी असंही म्हटलं की, भाजप पक्षाला विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याची गरज आहे. आम्ही अशी मागणी करतो आहोत की, काँग्रेसच्या समविचारी सर्व पक्षांशी संवाद सुरु करण्यात यावा, जेणेकरुन २०२४ साठी एक विश्वसनीय पर्याय लोकांसमोर सादर करता येईल.

या समूहातील एक प्रमुख सदस्य तसेच माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी अलिकडेच एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, गांधी परिवाराला आता काँग्रेसचं नेतृत्व सोडून दिलं पाहिजे. तसेच इतर कुणाला तरी संधी दिली पाहिजे. त्यांच्या या वक्तव्यानंतर ते ज्या मतदारसंघातून खासदार राहिलेले आहेत, तिथल्याच जिल्हा काँग्रेसने त्यांच्याविरोधात पक्षाच्या शिस्तभंगामुळे कारवाईची मागणी केली आहे.

काँग्रेसच्या अंतर्गत बदल व्हावेत, अशी मागणी करणाऱ्या या समूहाविरोधात गांधी परिवाराशी एकनिष्ठ नेत्यांनीही हल्ले चढवले आहेत. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी जी-२३ नेत्यांवर टीका केली आहे. त्यावेळी त्यांनी म्हटलंय की, कपिल सिब्बल कुठले नेते आहेत मला माहिती नाहीत. मात्र, त्यांना स्वत:ला काँग्रेस पक्षामुळे बरेच लाभ झाले आहेत. जेंव्हा यूपीएचं सरकार सत्तेवर होतं आणि ते जेंव्हा मंत्री होते तेंव्हा त्यांचं सगळं व्यवस्थित होतं मात्र, आता सत्ता गेल्यावर त्यांना वाईट वाटतंय. (Kapil Sibal)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com