कॉंग्रेसचा रिझर्व्ह बँकेला 18 जानेवारीला घेराओ

कॉंग्रेसचा रिझर्व्ह बँकेला 18 जानेवारीला घेराओ

नवी दिल्ली : घटनात्मक संस्थांच्या आदराचे दावे करणाऱ्या काँग्रेसने 18 जानेवारीला 'रिझर्व्ह बँकेला' घेराओ घालून नोटाबंदी विरोधातील आपल्या आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच दिल्लीत झालेल्या 'जनवेदना' संमेलनाच्या धर्तीवर राज्यांमध्येही अशा प्रकारचे मेळावे घेण्याचा आदेश प्रदेश शाखांना दिला आहे.


दिल्लीत आज झालेल्या 'जनवेदना' संमेलनात काँग्रेसतर्फे इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करणारा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँका आणि एटीएमपुढील रांगांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या 100 हून अधिक जणांना प्रस्ताव मंजुरीद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. नोटाबंदीवरून सरकारविरुद्ध केल्या जाणाऱ्या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रकही या वेळी जाहीर करण्यात आले.


वरिष्ठ नेते व काँग्रेस अध्यक्षांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांनी हे वेळापत्रक जाहीर केले. तसेच राज्य व जिल्हा पातळीवरील निदर्शनांचा पहिला टप्पा कमालीचा यशस्वी झाल्याचाही दावा त्यांनी केला. या वेळापत्रकानुसार 18 जानेवारीला रिझर्व्ह बँकेच्या मुख्य आणि सर्व प्रादेशिक कार्यालयांना घेराव घालून नोटाबंदीबाबत विरोध व्यक्त केला जाईल. 20 ते 25 जानेवारीदरम्यान सर्व राज्यांमध्ये 'जनवेदना' संमेलनाप्रमाणे राज्य पातळीवरही संमेलन घेतले जाईल. 23 जानेवारी ते 20 फेब्रुवारी या दरम्यान तालुका पातळीवर 'जनवेदना पंचायत' बोलावली जाईल. तसेच उद्यापासून (ता. 12) ते 20 फेब्रुवारीपर्यंत 'बेहाली की बोलती तस्वीरे' हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com