"पप्पु' म्हटल्यामुळे कॉंग्रेस नेत्याची झाली हकालपट्टी!

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जून 2017

पप्पुला अदानी, अंबानी वा मल्ल्यांबरोबर हातमिळवणी करणे शक्‍य होते. मात्र त्याने तसे केले नाही. पप्पुला मंत्री वा पंतप्रधान होणेही शक्‍य होते. मात्र त्याने तो पर्यायही स्वीकारला नाही. त्याऐवजी त्याने मंदसोरला जाणे पत्करले

मेरठ- कॉंग्रेस पक्षाच्या उत्तर प्रदेशमधील एका वरिष्ठ नेत्याची पक्ष उपाध्यक्ष राहुल गांधी यांना "पप्पु' म्हटल्याबद्दल तडकाफडकी सर्व पदांवरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. कॉंग्रेसचे मेरठ जिल्हाध्यक्ष विनय प्रधान यांनी मध्य प्रदेशमधील मंदसोर येथे भेट देण्याचा प्रयत्न करण्याच्या गांधी यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करताना सोशल मिडीयावर त्यांचा उल्लेख पप्पु असा केला होता. सोशल मिडीयावर सामान्यत: पप्पु या नावाने राहुल यांची टिंगल केली जाते.

"पप्पुला अदानी, अंबानी वा मल्ल्यांबरोबर हातमिळवणी करणे शक्‍य होते. मात्र त्याने तसे केले नाही. पप्पुला मंत्री वा पंतप्रधान होणेही शक्‍य होते. मात्र त्याने तो पर्यायही स्वीकारला नाही. त्याऐवजी त्याने मंदसोरला जाणे पत्करले,'' असे प्रधान यांनी राहुल यांची प्रशंसा करताना म्हटले होते.

कॉंग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष रामकृष्ण द्विवेदी यांनी प्रधान यांनी पक्षाच्या घटनात्मक तत्त्वांची पायमल्ली केल्याचा निकाल दिला आहे. यामुळे "पक्षनेतृत्वाची प्रतिमा मलिन' करणाऱ्या प्रधान यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

टॅग्स