जब-जब मोदी डरते हैं... म्हणत काँग्रेस नेत्याचा मोदींवर हल्लाबोल

राहुल गांधींविरोधातील ही संपूर्ण कारवाई घटनाबाह्य आणि सूडाच्या राजकारणाने प्रेरित आहे.
NARENDRA MODI
NARENDRA MODI

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोमवारी राहुल गांधींची (Rahul Gandhi) साडेदहा तासांची चौकशी करण्यात आल्यानंतर आज दुसऱ्यादिवशीदेखील राहुल गांधींची ईडीकडून (ED) चौकशी सुरु करण्यात आली आहे. चौकशीला जाण्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी पोलिसांनी काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान सुरजेवालांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (Randeep Surjewala Attack On Central Government)

जब जब मोदी डरते हैं, पुलिस को आगे करते हैं। यह देश की लड़ाई है। यह सच की लड़ाई है। लड़ेंगे और जीतेंगे। असे ट्वीट त्यांनी केले आहे. सुरजेवाला म्हणाले की, जेव्हा एफआयआर नोंदवलेला नाही, तर मग चौकशीसाठी कसे बोलावले जाऊ शकते. ही संपूर्ण कारवाई घटनाबाह्य आणि सूडाच्या राजकारणाने प्रेरित आहे. ईडीची कारवाई म्हणजे जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणारा आवाज दाबण्याचा डाव आहे का?' असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. राहुल गांधी अनेक प्रश्नांवरून सरकारला घेरल्यानेच त्यांच्या विरोधात ही कारवाई केली जात असल्याचे सुरजेवाला म्हणाले.

ते म्हणाले की, "राहुल गांधी यांनी महागाईमुळे जनतेच्या हालअपेष्टांवर सातत्याने सरकारला घेरले आहे. यामध्ये पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅसचे वाढते दर या प्रश्नांसाठी राहुल गांधींनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यामुळे राहुल गांधींसमोर अडचण निर्माण झाली आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले तीन कायदे मागे घेण्यास भाग पाडले या सर्व घटनांमुळे केंद्राकडून राहुल गांधींविरोधात सुडाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com