पोटगीची तरतूद केल्यास तोंडी तलाकला पाठिंबा

congress stand on tripple talaq
congress stand on tripple talaq

नवी दिल्ली : केंद्र सरकारने तोंडी तलाकविरोधी विधेयकामध्ये महिलांसाठी पोटगीची तरतूद केल्यास या विधेयकाला पाठिंबा देऊ, अशी अट कॉंग्रेसने आज घातली. 
अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी सांगितले की, आम्ही कधीच तोंडी तलाकविरोधी विधेयकाच्या विरोधात नव्हतो. जर सरकार या विधेयकात महिलांसाठी पोटगीची तरतूद करत असेल, तर कॉंग्रेस या विधेयकाला निश्‍चितच पाठिंबा देईल.
 
दरम्यान, सरकार महिला आरक्षण विधेयकासाठी तोंडी तलाक विधेयकाची अट ठेवून सौदेबाजी करत असल्याचा आरोपही देव यांनी केला. त्या म्हणाल्या की, तोंडी तलाक विधेयकाचे सध्याचे स्वरूप मुस्लिम महिलांसाठी नुकसानदायक ठरणारे आहे. यामध्ये पीडित महिलांसाठी पोटगीची तरतूद असली पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com