गुजरातमधील काँग्रेसचे 44 आमदार बंगळूरला

वृत्तसंस्था
शनिवार, 29 जुलै 2017

आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी काँग्रेसच्या तीन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आता काँग्रेसने आणखी पडझड रोखण्यासाठी आमदारांना बंगळूरला नेले आहे.

अहमदाबाद : राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने आता काँग्रेसने आपल्या 44 आमदारांना थेट बंगळूरला नेऊन ठेवले आहे. 

आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी काँग्रेसच्या तीन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आता काँग्रेसने आणखी पडझड रोखण्यासाठी आमदारांना बंगळूरला नेले आहे. आतापर्यंत भाजपवासी झालेल्या आमदारांची संख्या सहावर पोचली आहे. आमदारांच्या या फाटाफुटीमुळे कॉंग्रेसच्या चिंता आणखी वाढल्या आहेत. 

येत्या आठ ऑगस्ट रोजी राज्यसभेसाठी निवडणूक होत असून गुजरातमधून कॉंग्रेसने ज्येष्ठ नेते आणि कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांना रिंगणात उतरविले आहे. आमदारांची ही गळती थांबली नाही, तर अहमद पटेलांचे भवितव्य संकटात येऊ शकते. बालासिनोरचे आमदार मानसिंह चौहान आणि वनसदाचे छन्नाभाई चौधरी यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष रमणलाल व्होरा यांच्याकडे सुपूर्द केला आहे. आनंदमधील थासराचे आमदार रामसिंह परमार यांनीही राजीनामा दिल्याचे समजते. आमदारांच्या राजीनामा सत्रामुळे कॉंग्रेसची विधिमंडळातील सदस्यसंख्या घटली आहे. मागील आठवड्यामध्ये ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी बंडाचे निशाण फडकावले होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

देश

बंगळूर - माजी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई व 'कॅफे कॉफी डे'चे मालक व प्रवर्तक व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या देशभरातील...

12.00 PM

अहमदाबाद : सोशल मीडियातील 'विकास वेडा झालाय' या उपहासात्मक टीका मोहिमेमुळे गुजरातमधील भाजपचे सरकार; तसेच नेते अक्षरश: धास्तावले...

10.24 AM

नवी दिल्ली - देशातील रोजगाराच्या संधी मागील तिमाहीमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानंतर रोजगार शोधणाऱ्या तरुणांसाठी पुन्हा नव्या...

09.12 AM