येथे सुकलं कमळ; पंजाला आलं बळ!

टीम ई सकाळ
रविवार, 12 मार्च 2017

गोव्याच्या भूमीत काँग्रेसचा रे 'हात'!

भारतीय जनता पक्षाची संख्या एक तृतीयांशहून अधिक घटली असून ती आता 13 झाली आहे. दुसरीकडे काँग्रेसने मुसंडी मारत मागील वेळच्या आकडेवारीत दुपटीने वाढ केली आहे. काँग्रेसची आमदार संख्या 9 वरून 17 झाली आहे. 

पणजी : केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे भाजप सत्तेत असताना गोव्यात काँग्रेसने सत्ताधारी भाजपला धक्का देत 17 जागांवर विजय मिळवला. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे होम ग्राऊंड असलेल्या या छोटेखानी राज्यात सत्ताधारी भाजपला 13 जागांवर समाधान मानावे लागले. 

राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा जिंकत खाते उघडले आहे. तसेच, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे 3, तर गोवा फॉरवर्ड पार्टीचे 3 उमेदवार निवडून आले आहेत. आम आदमी पक्षाला मात्र येथे खातेही उघडता आलेले नाही. 

गोमंतकीय जनता काँग्रेसच्या बाजूने कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एकंदर विचार करता काँग्रेसचे पारडे जड झालेले दिसत असून, मुख्यमंत्री काँग्रेसचाच बनेल हे स्पष्ट झाले आहे.

मागील विधानसभा निवडणुकांमध्ये गोव्यात भारतीय जनता पक्षाचे तब्बल 21 आमदार निवडून आले होते. यावेळी त्यांची एक तृतीयांशहून अधिक संख्या घटून ती आता 13 झाली आहे. दुसरीकडे काँग्रेसने मुसंडी मारत मागील वेळच्या आकडेवारीत दुपटीने वाढ केली आहे. काँग्रेसची आमदार संख्या 9 वरून 17 झाली आहे.