'युपी'त भ्रष्टाचार; समाजवादी पक्षात सत्तेसाठी संघर्ष: भाजप

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

लखनौ : उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने समाजवादी पक्षावर निशाणा साधला आहे. ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, भ्रष्टाचार आणि प्रशासनाचा अभाव असतानाही समाजवादी पक्षात सत्तेसाठी अंतर्गत वाद सुरू असल्याची टीका भाजपने केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते विजय बहादूर पाठक म्हणाले, 'हे संपूर्णपणे राजकीय नाट्य आहे. पक्ष गोंधळात आहे आणि ते भाजपविरुद्ध लढा देण्याबाबत बोलत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि समाजवादी पक्षात सत्तेसाठी कौटुंबिक संघर्ष सुरू आहे. या प्रकारामुळे उत्तर प्रदेशमधील जनता नाराज झाली आहे. मला आशा आहे की बदल घडेल.'

नेतृत्त्वाच्या मुद्यावरून समाजवादी पक्षात अंतर्गत वाद सुरू आहेत. हे वाद निवडणूक आयोगापर्यंत पोचले आहेत. सायकल चिन्हाबाबत निवडणूक आयोग निर्णय देणार आहे. या प्रकरणाची आयोगासमोर आज पहिली सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे या पाचही राज्यात निवडणुकीचे वातावरण पसरले आहे. अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे.

Web Title: Corruption in UP; SP engaged in internal fight : BJP