काश्मिर, मुफ्ती यांच्या विषयीचे अपशब्द भाजप नेत्याला पडले महागात

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी कथुआमध्ये काढलेल्या मोर्चावेळी राजेंद्र सिंह यांनी मुफ्ती यांच्याविषयी अपमानास्पद भाषा वापरली होती. या भाषणाची 26 सेकंदाची व्हडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. यामध्ये सिंह हे मुफ्ती यांच्याविषयी असभ्य भाषा वापरून आपल्या समर्थकांना खुष करत होते. त्याला अटक करण्यासाठी एवढा पुरावा पुरेसा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यानुसार कलम 509  (अपशब्द, हावभाव किंवा स्त्रीच्या विनम्रतेचा अपमान करणे), तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66अ नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जम्मू : जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याविषयी अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या भाजप नेत्याला अटक करण्याचे वॉरंट जम्मू-काश्मिर न्यायालयाने काढले. राजींदर सिंह असे या भापच नेत्याचे नाव असून, जम्मू-काश्मिरचे माजी वनमंत्री लाल सिंह यांचा तो भाऊ आहे. हिरानगर पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस अधिकारी (एसएचओ) यांनी या प्रकरणी मंगळवारी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायाधीश ए. एस. लांगेश यांनी सिंह याला अटक करण्याचे वॉरंट काढले. अटक टाळण्यासाठी राजींदर सिंह जम्मूतील उधमपूर, पठाणकोट आदी ठिकाणे बदलत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.  

मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी कथुआमध्ये काढलेल्या मोर्चावेळी राजेंद्र सिंह यांनी मुफ्ती यांच्याविषयी अपमानास्पद भाषा वापरली होती. या भाषणाची 26 सेकंदाची व्हडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. यामध्ये सिंह हे मुफ्ती यांच्याविषयी असभ्य भाषा वापरून आपल्या समर्थकांना खुष करत होते. त्याला अटक करण्यासाठी एवढा पुरावा पुरेसा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यानुसार कलम 509  (अपशब्द, हावभाव किंवा स्त्रीच्या विनम्रतेचा अपमान करणे), तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66अ नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
कथुआ जिल्ह्यातील लाखनपूर ते हिरानगरपर्यंत 20 मे ला 'डोग्री स्वाभीमानी'तर्फे मोठी रॅली काढण्यात आली होती. यामध्ये राजींदर सिंह सुद्धा सहभागी झाला होता. देशाला हादरवून टाकणारी घटना जम्मू-काश्मिर मधील कथुआ मध्ये घडली होती. अल्पसंख्याक समाजातल्या भटक्या विमूक्त समाजातील आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील आरोपींच्या समर्थनाथ हिंदू एकता मंचच्या वतिने मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये सहभागी झाल्यामुळे राजींदर सिंह यांचे भाऊ माजी वनमंत्री लाल सिंह यांना राजीनामा द्यावा लागला होता.

Web Title: court issues arrest warrant against BJP leader